पवारांचा एकमेव आमदारही अजितदादांच्या पाठिशी; सरकारी कार्यक्रमात फोटो झाला ‘क्लिक’…

पुणे : विधानसभेच्या निकालानंतर अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पक्षाला रामराम करत सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा चंग बांधल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्यात आता शरद पवारांनाही (Sharad Pawar) मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात असून, पवारांच्या एकमेव आमदाराचा अजितदादांच्या (Ajit Pawar) पाठीमागे असल्याचा फोटो कॅमेरात कैद झाला आहे. त्यामुळे लवकरच संबंधित आमदार पवारांची ‘तुतारी’ खाली ठेवून मनगटावर दादांच्या पक्षाचं ‘घड्याळ’ बांधणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. (Sharad Pawar MLA Bapusaheb Pathare Spot With Ajit Pawar)
राज्यात गाजत असलेला छावा चित्रपट करमुक्त करणार का?, मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी काय दिलं उत्तर?
पवारांच्या आमदाराचा फोटो कुठे झाला क्लिक?
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज (दि.19) 395 वी जयंती संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. याच निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणजेच पुण्यातील किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
Video : छत्रपती शिवराय माझ्यासाठी फक्त नाव नाही, तर..पंतप्रधान मोदींनी शेअर केला एक व्हिडिओ
पण यावेळी शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत शरद पवार पक्षाचे एकमेव आमदार बापू पठारे (Bapu Pathare) यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली. पठारे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेताना दिसून आले. एवढेच नव्हे तर, पठारे सरकारी मंचावर अजित पवारांच्या मागे बसलेले दिसून कॅमेरात टिपले गेले आहे.
Video : नानांचा सवाल अन् जयंतरावांचं परफेक्ट उत्तर.. ‘पॉलिटिक्स’चा हिशोब नानांनीही केला मान्य
पठारे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चा
बापू पठारे हे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यात आज त्यांनी थेट सरकारी कार्यक्रमात उपस्थिती लावल्याने ते खरंच शरद पवारांची साथ सोडणार असल्याची शक्यता बळावली आहे. मात्र, मतदारसंघातील कामानिमित्त आपण फडणवीस आणि अजित पवारांची आपण भेट घेतल्याचं स्पष्टीकरण पठारे यांनी दिलं आहे.