विद्यार्थ्यांनी स्वावलंबी बनावं; नवसह्याद्रीच्या स्नेहसंमेलनात अभिनेते मकरंद अनासपुरेंचा संदेश…

Students should self-reliant; Actor Makarand Anaspure’s message : पुणे जिल्ह्यातील नायगाव भोर या ठिकाणी उभे असलेले सुसज्य शैक्षणिक संकुल नवसह्याद्री शैक्षणीक संकुल येथे सालाबाद प्रमाणे होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलन वेलोसिटी २०२५ मध्ये मोठी रंगत पाहण्यास मिळाली. १३ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू झालेल्या या उत्सवात कल्चरल डेज व स्पोर्ट डेज मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आपल्या कलागुणांना वाव देत होते. अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
शिवसेनेच्या मंत्र्यांच्या ओएसडींकडून पाच लाखांची मागणी; अमोल मिटकरींचा मोठा गौप्यस्फोट
यावेळी विद्यार्थ्यांनी शिवगर्जना ,विविध पथनाट्य, दिंडी सोहळा आयोजित केला होता. खरे आकर्षण ठरले ते म्हणजे नगरच्या सुप्रसिद्ध ऋषिकेश हराळ, निलेश वैरागर, सोनू यलगम व सनी सकट यांच्या रील टीमचे. ह्या टीमने नवसह्याद्री सोबत ज्या रील्स बनवल्या त्यांना सुमारे ४ ते ५ लाख चहात्यांनी लाईक केले. २१ व २२ फेब्रुवारी २०२५ रोजी नवसह्याद्रीच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राजगड साखर कारखान्याचे संचालक मंडळ, राजगड पोलीस स्टेशनचे पदाधिकारी ,नायगाव- नसरापूर पंचक्रोशीतील सर्व ग्रामपंचायत ते सदस्य मंडळ, विविध स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, शैक्षणिक संस्थेचे प्राचार्य, युवा उद्योजक आदी उपस्थित होते.
स्वारगेट बस प्रकरण, परिवहन मंत्र्यांची मोठी कारवाई, डेपोतील 23 सुरक्षारक्षक सस्पेंड
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात व मनामनात ज्यांनी आपल्या हास्यकलेने घर केले असे सुप्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे , ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक मुलगा अथवा मुलगी इंजिनियर डॉक्टर फार्मासिस्ट मॅनेजर व्हावी असा माणस असणारे शिक्षण सम्राट नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मा. पोपटरावजी सुके साहेब , ग्रुप संचालक सागर जी सुके सर, संस्थेच्या माऊली सौ. सुनंदाताई सुके, संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. सायली ताई सुके, गुरुकुल स्कूलच्या संचालिका सौ. सानवी सुके, विश्वस्त नानासाहेब सुके, नव सह्याद्रीचे ग्रुप चे प्रमुख व संचालक डॉ. तानाजी दबडे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.किशोर ओतारी, इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.अमोल लोखंडे , पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.पंकज भोकरे,एनजीआय वेलोसिटी २०२५ चे गॅदरिंग सेक्रेटरी डॉ. सुहास पाखरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले, डॉक्टर सुहास पाखरे यांनी शिवगर्जना करून सर्व वातावरण शिवमय केले. सुहास पाखरे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात नव सह्याद्रीचा मागील सोळा वर्षाचा प्रगतीचा आलेख सांगितला.
स्वारगेट बस स्थानकातील घटना संतापदायक, आरोपीला तात्काळ अटक करा; अजित पवार ॲक्शन मोडमध्ये
मकरंद अनासपुरे म्हणाले , खऱ्या अर्थाने पोपटराव सुके साहेबांनी २०१० मध्ये लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्ष झाले आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच आपल्या कलागुणांना वाव दिला पाहिजे तसेच कष्ट करण्याची तयारी असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही असे परखडपणे सांगितले. तसेच त्यांनी सिनेमातील दोन-तीन डायलॉग्स घेऊन वातावरण संपूर्ण हास्यमय केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
गोड बोलला, जीवे मारण्याची धमकी अन्…, स्वारगेट बस स्थानकात पहाटे 5.30 वाजता नेमकं काय घडलं ?
यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आर्ट गॅलरीचे व नवसह्याद्रीच्या नेक्सस २०२५ मॅगझीन तसेच प्रज्वल पवार, संकेत जाधव यांसारख्या विविध विद्यार्थ्यांच्या व प्रा.संकेत जाधव व डॉ.लक्ष्मण रेनापुरे यांच्यासारख्या शिक्षकांच्या नवीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. दोन्हीही दिवस सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ३०००-४००० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दाखवली. अध्यक्षीय भाषणात मा. पोपटराव सुके म्हणाले, नव सह्याद्री शैक्षणिक संकुलाच्या स्थापनेमागे माझे सर्व कुटुंबातील सदस्य यांनी मोलाची साथ दिली. गुरु व शिष्य हे नाते ज्यांनी जोपासले त्यांना आयुष्यात यशाच्या शिखरापर्यंत जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. संकुलातील विद्यार्थी रिसर्च, कॉम्पिटिशन, युनिव्हर्सिटी टॉपर, प्लेसमेंट ,तसेच विविध कलागुणांमध्ये प्रगतीपथावर असल्यामुळे आनंद व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राम घुगे , प्रा. नवनाथ गोवेकर यांनी प्रमुख पाहुणे मकरंद अनासपुरे यांची ओळख आपल्या कला शैलीत केली व ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मदत केली त्या सर्व संयोजक ,आयोजक, ग्यादरिंग च्या सर्व कमिटी चे सदस्य, शिक्षक शिक्षकेतर वृंद व खास करून डिसिप्लिन कमिटी चे आभार डॉ .प्रमोद जाधव यांनी केले. नवसह्याद्रीच्यात झालेल्या या गॅदरिंगने संपूर्ण पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांमध्ये ऍडमिशन साठी एक नवा कौल निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.