तुम्हाला लवकर पचणी पडणारं नाही; आखाड्यात उतरतं मोहोळांचं सुळेंना जिव्हारी लागणारं प्रत्युत्तर

  • Written By: Published:
तुम्हाला लवकर पचणी पडणारं नाही; आखाड्यात उतरतं मोहोळांचं सुळेंना जिव्हारी लागणारं प्रत्युत्तर

पुणे : लोकसभेच्या निकालानंतर काल (दि.9) नवी दिल्ली येथे मोदींच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यात पुण्यातून खासदार म्हणून निवडणून आलेल्या मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supria Sule) पुण्याला मिळालेल्या मंत्रिपदाचा उपयोग पुण्यालाच व्हावा, कंत्राटदारांना नाही, असं म्हणत मुरलीधर मोहोळांना टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेला आता मोहोळांनी मैदानात उतरतं सुळेंना जिव्हारी लागणारं प्रत्त्युत्तर दिले आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्ही खासदारांमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून तु-तु मै- मै होणार हे अधोरेखित झाले आहे. (Murlidhar Mohol Answer To Supria Sule Criticism)

Murlidhar Mohol : कसलेला पैलवान, महापौर अन् आता खासदारकीचा उमेदवार…

काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

पुण्याला मंत्रिपद मिळालं, त्याचा उपयोग पुण्याला व्हावा, कंत्राटदारांना नाही. पुण्यात प्रशासनच नाही, त्यामुळे पुण्याची अशी परिस्थिती आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून देशातील लोक विद्यार्थी येतात. मात्र, अशा घटनांनी पुण्याचं नाव खराब होत आहे. पुण्याची सगळी परिस्थिती सरकारमुळे झाली आहे.

उदयनराजेंना थांबवून भाजपचा मोहोळांवर डाव… फडणवीसांनी एका दगडात मारले पाच पक्षी

मोहोळांचे प्रत्युत्तर काय?

सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेनंतर आता मुरलीधर मोहोळ यांनी सुप्रिया सुळेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यात ते म्हणतात की, मा. सुप्रियाताई, शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद ! खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं.

ताई, आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो.

मुरलीधर मोहोळ कलमाडी, धारिया यांच्या रांगेत ! तब्बल 28 वर्षानंतर जनतेतून निवडून आलेला खासदार मंत्री

उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही असे मोहोळ यांनी त्यांच्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या दोन्ही नेत्यांच्या  एकमेकांवरील टीकांमुळे येत्या काळात पुण्यातील विकासाच्या मुद्यावरून मोहोळ आणि सुळेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज