पाच नावं, पब व बारकडून 90 लाखांची वसुली : अंधारे-धंगेकरांनी अधिकाऱ्यांसमोरच वाचली यादी
Sushma Andhare Aggressive on Excise Department after Pune Accident : पुणे अपघात ( Pune Accident ) प्रकरणानंतर पुण्यामध्ये कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. त्यातच आता धंगेकरांसह मोहन जोशी, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयासमोर यांनी आंदोलन केलं. त्यावेळी त्यांनी उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department ) पाच अधिकाऱ्यांसमोर पब, बारवाल्यांकडून 90 लाखांची वसुली करणाऱ्या पोलीसांच्या नावाची यादीच वाचून दाखवली.
धंगेकर आणि अंधारे आक्रमक! उत्पादन शुल्क विभागासमोर आंदोलन, कारवाईला दिले 48 तास
यावेळी अंधारे आणि धंगेकरांनी वसुलीचे आरोप करताच उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ते फेटाळुन लावले. मात्र अंधारे यांनी थेट हप्ते घेणार्या पोलिसांची यादीच वाचून दाखवली. त्यामध्ये त्यांनी कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ, सुप्रिटेंड चरणसिंह रजपूत हे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हप्ते वसुली करत असल्याचा आरोप केला आहे.
Panchayat 3: प्रतीक्षा संपली! ‘पंचायत सीझन 3’ ओटीटीवर होणार रिलीज, मग जाणून घ्या कधी आणि कुठे?
त्याचबरोबर हे पाच पोलीस कोणत्या पब आणि हॉटेल्सकडून कीती हप्ता वसुल करतात? याची देखील यादी वाचून दाखवली. त्यामध्ये त्यांनी पुढील नावं सांगितली आहेत…
द माफिया- 1 लाख रुपये
एजंट जॅक्स प्रत्येक आऊटलेटमागे प्रत्येकी 50 हजार रुपये
टू बीएचके- 1 लाख
बॉलर- 2 लाख
राजबहादूर मिल्स बिमोरा- 1 लाख
मिल्ट- 1 लाख
टीटीएम रुफटॉप- 5 हजार
स्काय स्टोरी -50 हजार
जिमी दा ढाबा- 50 हजार
टोनी दा ढाबा- 50 हजार
आयरिश- 40 हजार
टल्ली टुल्स- 50 हजार
अॅटमोस्पिअर- 60 हजार
रुड लॉर्ड – 60 हजार
24 के- दीड लाख
कोको रिको हॉटेल- 71 हजार रुपये
पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक देत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे गोरख धंदे करतात, याचा पाढा वाचला.
पुण्यातील नाईट लाईफला पाठीशी घालणाऱ्या अजून पर्यंत शुल्काचे… pic.twitter.com/QA2o40S7u8
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 27, 2024
त्यामुळे आता पुणे अपघातानंतर रोज नवीन कारवाई होत असताना. दुसरीकडे पोलिसांबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कामकाजवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच या अधिकाऱ्यांवरील अंधारे-धंगेकरांच्या कथित वसुलीच्या कथित आरोपांनंतर या प्रकरणाला आणखी एक वळण मिळालं आहे. तसेच अंधारे-धंगेकरांनी वाचून दाखवलेल्या यादीतील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हप्ते वसुली करत असलेल्या पोलीसांवर कारवाई होणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.