मोठी बातमी! अखेर गोखले बिल्डरकडून जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द; म्हणाले, नैतिकतेच्या…
The Jain boarding गैरव्यवहार प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यानंतर आता अखेर हा व्यवहार गोखले बिल्डरकडून रद्द करण्यात आला आहे.
The Jain boarding land transaction by Gokhale Builder is cancelled after Muralidhar Mohol Troll : पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचे कथित गैरव्यवहार प्रकरण चांगलेच तापले आहे. (Pune) पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर याप्रकरणी गंभीर आरोप होत आहेत. मोहोळ यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर आता अखेर हा व्यवहार गोखले बिल्डरकडून रद्द करण्यात आला आहे.
अखेर गोखले बिल्डरकडून व्यवहार रद्द !
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेचा गैरव्यवहार प्रकरणी वातावरण तापल्यानंतर अखेर बिल्डर विशाल गोखले यांनी हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गोखले यांनी ईमेलवरून जैन ट्रस्टला माहिती दिली आहे. त्याचबरोबर व्यवहारातील 230 कोटी रुपये परत देण्याची विनंती केली. धर्मादाय आयुक्तालयाला देखील पत्र पाठवण्यात आलं आहे. यामध्ये नमूद करण्यात आलं आहे की, नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहेय तसेच जैन धर्मियांच्या यामुळे भावना दुखवायच्या नव्हत्या. असेही गोखले बिल्डर म्हणाले आहेत.
आम्ही टोकाची भूमिका घेण्याच्या आधी… जैन बोर्डिंग प्रकरणी राजू शेट्टी यांनीही दिला मोहोळांना इशारा
दरम्यान जैनमुनींनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये बोलताना ते म्हणाले, मंत्री आणि खासदार मोहोळ यांनी या ठिकाणी भेट देत मी तुमची समस्या सोडवेन असं म्हटलं आहे. मात्र, समाजाला त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे उद्या (27) संपूर्ण देशात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. आम्ही गावाखेड्यात मोर्चा काढू आणि अधिकाऱ्यांनी निवेदन देऊ. रवींद्र धंगेकर यांच्याबाबत बोलताना जैनमुनी म्हणाले की, राष्ट्रीय माध्यमात मांजर नाचलं तरी व्हिडियो येतो, मात्र महावीर स्वामींचं मंदिर विकलं गेलं तरी राष्ट्रीय माध्यमं गप्प आहेत असा टोला त्यांनी लागवला.
