भारताने न्यूझीलंडला धक्का कसा दिला? टीम इंडियाने घेतला 2000 आणि 2021 चा बदला

Reasons Team India Defeat New Zealand In Champions Trophy : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं विजेतेपद (Champions Trophy 2025) जिंकलंय. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 7 विकेटच्या मोबदल्यात 251 धावा केल्या. भारतीय संघाने 49 व्या षटकात 6 विकेट्स गमावून लक्ष्य (Cricket News) गाठलंय. पहिल्यांदाच, भारताने न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना जिंकलाय. याआधी संघाने दोन सामने गमावले (Team India Defeat New Zealand) आहेत. भारताच्या विजेतेपदाच्या सामन्यातील विजयाची कारणे जाणून घेऊ या.
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जलद सुरुवात केलीय. रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी चांगली सुरुवात करून दिली. पण यानंतर वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांनी भारताचं पुनरागमन घडवून आणलं. या सामन्यात भारताकडून फिरकी गोलंदाजांनी 38 षटकांत 144 धावा देत 5 बळी घेतले. यामुळे किवींचा डाव 251 धावांवर थांबला.
खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत होती. सुरुवातीला रोहित शर्माने वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्याने 41 चेंडूत अर्धशतक झळकावले. गिल मुक्तपणे खेळू शकला नाही, पण बॅटिंग पॉवरप्लेमध्ये भारताने 64 धावा केल्या. यामुळे, जेव्हा फिरकीपटू आले, तेव्हा विकेट पडल्यानंतरही भारताचा धावगती फारशी कमी झाली नाही. रोहितने 76 धावा केल्या.
केन विलियमन हा न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज आहे. त्याने उपांत्य सामन्यात शतक झळकावले. भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही त्याने चांगली खेळी केली. पण कुलदीप यादवने त्याला हलू दिले नाही. त्याने येताच चांगले शॉट्स खेळले, पण 14 चेंडूत 11 धावा काढल्यानंतर कुलदीपने त्याला झेलबाद केले.
पुणे मेट्रो रोखली, पोलिसांशी हुज्जत घातली ! नरेंद्र पावटेकरांची लगेच राष्ट्रवादीतून हकालपट्टी
भारतीय संघाकडून रोहित आणि गिलने 105 धावा जोडल्या. पण रोहित, गिल आणि विराट पुढील 17 धावा काढत बाद झाले. किवी फिरकीपटूंनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले होते. यानंतर, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलची जोडी नाबाद राहिली. दोघांमध्ये 75 चेंडूत 61 धावांची भागीदारी झाली. यामुळे भारतीय संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवले.
2023 च्या विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाचा सर्वात मोठा खलनायक केएल राहुल मानला जात होता. पण त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार खेळ केला. अंतिम सामन्यातही तो सहाव्या क्रमांकावर आला, त्याने नाबाद सामना जिंकणारी खेळी खेळली. त्याने फिरकी गोलंदाजांचाही धाडसाने सामना केला.