उलटफेर करणाऱ्या नेदरलँडची फलंदाजी ढासाळली; अफगाणिस्तानसमोर 180 धावांचे आव्हान

उलटफेर करणाऱ्या नेदरलँडची फलंदाजी ढासाळली; अफगाणिस्तानसमोर 180 धावांचे आव्हान

World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकामध्ये (World Cup 2023) मोठा उलटफेर करणाऱ्या नेदरलँडच्या फलंदाजांनी अफगाणिस्तानसमोर (AFG vs NED) शरणागती पत्कारली. लखनऊच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर अफगाणिस्तानने नेदरलँड्सला 46.3 षटकात 179 धावांत ऑलआउट केले. या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय लखनऊच्या खेळपट्टीवर त्यांच्यासाठी अजिबात अनुकूल नव्हता. नेदरलँडकडून सायब्रँड एंजेलब्रेक्टने सर्वाधिक 58 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नबीने 3 तर नूरने 2 विकेट घेतल्या.

नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या नेदरलँडची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर वेस्ली बॅरेसीच्या (01) रूपाने संघाने पहिली विकेट गमावली. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी मॅक्स ओ’डॉड आणि कॉलिन अकरमन यांनी 69 धावांची (63 चेंडू) भागीदारी केली. ही नेदरलँडच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी होती. ही भागीदारी 12व्या षटकात मोडली. मॅक्स ओ’डॉड 40 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 42 धावा करून बाद झाला.

Elvish Yadav कोण आहे? पाहा फोटोंच्या माध्यमातून…

त्यानंतर 19व्या षटकात कॉलिन अकरमन 29 धावा काढून बाद झाला. यानंतर पुढच्याच चेंडूवर कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (0) पॅव्हेलियनमध्ये परतला. दोन्ही सलामीवीर आणि कर्णधार एडवर्ड्स धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. संघाच्या एकूण चार फलंदाजांनी धावबाद होऊन विकेट गमावल्या. काही वेळातच कर्णधार मोहम्मद नबीने 21व्या षटकात बास डी लीडे (3)ची विकेट घेतली. अशाप्रकारे संघाने 97 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या.

Naal 2 Trailer: चैतूचा नाळ भाग 2’चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित

त्यानंतर 26व्या षटकात साकिब झुल्फिकार 03 धावा करून नूर अहमदच्या जाळ्यात अडकला. यानंतर 31व्या षटकात लोगान व्हॅन बीक 02 धावा आणि चांगला खेळत असलेला सायब्रँड एंजेलब्रेक्ट 6 चौकारांच्या मदतीने 58 धावांवर बाद झाला. त्यानंतर 42 व्या षटकात रोएलॉफ व्हॅन डर मर्वे 11 धावांवर बाद झाला. पॉल व्हॅन मीकरेन 04 धावांवर बाद झाला.

अफगाणिस्तानने गोलंदाजीत कमाल केली
अफगाणिस्तानसाठी अनुभवी फिरकी गोलंदाज मोहम्मद नबीने 9.3 षटकात केवळ 28 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय नूर अहमदने 2 फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवले. तर मुजीब उर रहमानला 1 विकेट मिळाली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube