‘आरपीआय’मध्ये गटबाजी उफाळली; निर्णयाचा चेंडू थेट आठवलेंच्या दारी

‘आरपीआय’मध्ये गटबाजी उफाळली; निर्णयाचा चेंडू थेट आठवलेंच्या दारी

Ahmednagar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन (Republican Party)पक्षाच्या आठवले गटाच्या नगर जिल्ह्यातील कार्यकारिणीत गटबाजी उफळून आली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) (Republican Party athawale group)पक्षाच्या केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. बी.के. बर्वे यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या कार्यकारिणीची मुदत संपलेली नाही.

अभिमानास्पद! रश्मी करंदीकरांना राष्ट्रपती पदक जाहीर, राज्यातील 78 पोलिसांचा होणार सन्मान

नवीन जिल्हाध्यक्ष संजय भैलूमे यांची निवड ही पक्षाच्या घटनेला व नियमाला डावलून करण्यात आली आहे. कार्यरत जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिलेला नसताना, त्यांची मुदत संपलेली नसताना अचानक गुपचूपपणे नवीन जिल्हाध्यक्षांची झालेली निवड ही बेकायदेशीर असल्याचे स्पष्टीकरण रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिले.

IND vs ENG : इंग्लंडचा ‘हा’ फलंदाज सचिनलाही भारी; फक्त 29 धावा केल्या अन् बनला नंबर वन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरुन वाद निर्माण झाला आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष साळवे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आदेश व कार्यकर्त्यांच्या भावनेचा अनादर करुन हुकूमशाही पध्दतीने पक्षाच्या धोरणाला पायदळी तुडवून नवीन जिल्हाध्यक्ष निवड करणारे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव याची हकालपट्टी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपस्थित रिपाईच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली.

निवडणूक निर्णय अधिकारी राहिलेले श्रीकांत भालेराव यांनी पक्षाचे केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकारी बर्वे यांच्याकडे सादर केलेली जिल्हाध्यक्षांच्या कार्यकारणीची मुदत संपलेली नाही. राहुरी फॅक्टरी येथे रिपाईच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अंतिम टप्प्यात अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी निघून गेल्यानंतर जिल्हाध्यक्षपदी संजय भैलुमे यांची निवड करण्यात आली. ती निवड बेकायदेशीर व पक्षाच्या घटनेप्रमाणे नाही असा आरोप साळवे यांनी केला आहे.

नवीन जिल्हाध्यक्ष निवडीला विरोध करुन अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना फोनद्वारे कल्पना दिली होती. मंत्री आठवले यांनी श्रीकांत भालेराव यांना सांगून देखील त्यांनी तो आदेश डावलून नवीन जिल्हाध्यक्षांची निवड केली. पक्षाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जी कार्यकारणी आहे, तीच अधिकृत असल्याचे साळवे यांनी स्पष्ट केले आहे.

संपर्कप्रमुखांची हकालपट्टी करा, आठवलेंकडे मागणी
संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव पक्षात गटा-तटाचे राजकारण करुन पक्षाचे नुकसान करत आहे. कार्यकर्त्यांना त्रास देऊन हुकूमशाही पद्धतीने निर्णय घेतले जात असल्याची तक्रार, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मुंबईमध्ये भेट घेऊन करण्यात आली आहे. अशा संपर्क प्रमुखाच्या हकालपट्टीची मागणी आठवले यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष साळवे यांनी दिली. तर संपर्क प्रमुख वीस ते तीस वर्षापासून पदावर असून, त्यांचे वय झाले असल्याने नवीन संपर्कप्रमुख नेमण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube