Asian Games 2023 : सुवर्णवेध सुरूच! रायफल शुटिंगमध्ये मिळालं गोल्ड मेडल
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताची दमदार कामगिरी सुरूच आहे. आजपासून खेळांमध्ये अॅथलेटिक्स स्पर्धांनाही सुरुवात झाली. सुरुवातीला मुलांनी वर्ल्ड रेकॉर्डसह सुवर्णपदकावर नाव कोरलं. मुलींनीही चमकदार कामगिरी करत गोल्ड मेडलची कमाई केली. या स्पर्धेत नेमबाजीत भारताने आणखी एक सुवर्णपदक मिळवले. ऐश्वर्य प्रताप सिंह, स्वप्निल आणि अखिल यांच्या जोडीने सुवर्णपदक पटकावले. तिघांनी 50 मीटर रायफल या प्रकारात सुवर्ण कामगिरी केली. या तिघांचा 1769 असा स्कोर राहिला. विशेष म्हणजे, या तिघांनी चीनच्या खेळाडूंना जोरदार टक्कर दिली.
चीनच्या जिया मिंग, लिनशू आणि हाओ या तिघांना रौप्यपदक मिळाले. कांस्यपदकाची कमाई कोरियाच्या खेळाडूंनी केली. कोरियाच्या खेळाडूंचा 1748 असा स्कोअर राहिला. भारताकडून स्वप्निल आणि ऐश्वर्यने प्रत्येकी 591 गुण मिळवले. या गुणांसह त्यांनी क्वालिफिकेशन स्टेज पार केली. एशियन गेम्समध्ये नवीन रेकॉर्डही मोडला. अखिल याने 587 गुण मिळवले.
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाला धक्का ! स्टार गोलंदाज संघातून बाहेर
दरम्यान, या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 7 सुवर्णपदके मिळवली आहेत. नेमबाजीत 4, घोडेस्वारी आणि क्रिकेटमध्ये प्रत्येकी 1 आणि अन्य एक क्रीडा प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळाले. तसेच 11 कांस्यपदके आणि 7 रौप्यपदके आतापर्यंत मिळाली आहेत. 8 ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे. त्यामुळे भारताला आणखीही पदके मिळण्याची शक्यता आहे.
घोडेस्वारीत तब्बल 41 वर्षांनंतर सुवर्ण कामगिरी
याआधी तीन दिवसांपू्र्वी भारताने ऐतिहासिक कामगिरी करत घोडेस्वारीत तब्बल 41 वर्षानंतर सुवर्णपदक जिंकले. भारताने 1982 नंतर प्रथमच या प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. या स्पर्धेत भारत पहिल्यांदाच सहभागी झाला आहे. त्यामुळे भारताला सुवर्णपदकाची आशा तर सोडाच, कोणतेही पदक मिळण्याची शक्यता नव्हती. पण अशा कठिण परिस्थितीत या खेळाडूंनी अपेक्षेपलीकडे जाऊन इतिहास रचला आहे.
भारतासाठी सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या घोडेस्वारांमध्ये सुदीप्ती हाजेला, दिव्यकीर्ती सिंग, हृदय छेडा आणि अनुष अग्रवला यांच्या नावाचा समावेश आहे. या खेळाडूंनी सुवर्ण जिंकल्यानंतर काही वेळातच भारताने याच खेळाच्या एकाच स्पर्धेत एक रौप्य पदक आणि एक कांस्य पदकही पटकावले.
Asian Games 2023 : आणखी एक ‘सुवर्ण’वेध! एअर पिस्टल प्रकारात टीम इंडिया अव्वल