विदेशातील भारतीय शतकवीर; रोहित-विराटला अजूनही सचिनच भारी..

विदेशातील भारतीय शतकवीर; रोहित-विराटला अजूनही सचिनच भारी..

Team India : भारतीय क्रिकेट संघात दर्जेदार खेळाडूंचा (Team India) भरणा आहे. जुन्या संघातही असे अनेक खेळाडू होते जे एकहाती सामना फिरवू शकत होते. शतकांच्या बाबतीतही अव्वल होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. या यादीत विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण ज्यावेळी विदेशात सर्वाधिक शतक करणाऱ्या खेळाडूंचा विचार होतो तेव्हाही सचिन पहिल्या क्रमांकावर कायम आहे मात्र विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर नाही. चला तर मग जाणून घेऊ या विदेशात भारतीय संघासाठी कोणत्या खेळाडूने सर्वाधिक शतके केली आहेत.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय (Sachin Tendulkar) क्रिकेटमध्ये सर्वाधिक 100 शतके केली आहेत. यातील 58 शतके त्याने विदेशात केली आहेत. विदेशात सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सचिन अव्वल आहे. दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे. विराटने एकूण 42 शतके विदेशात केली आहेत. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 80 शतके केली आहेत.

रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाचाही मोठी घोषणा; T20 International cricketमधून निवृत्ती

राहुल द्रविड अन् दादाचा कारनामा

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर माजी खेळाडू राहुल द्रविड (Rahul Dravid) आहे. द्रविडने विदेशात एकूण 27 शतके केली आहेत. द्रविडनंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा नंबर आहे. गांगुलीने एकूण 26 शतके भारताबाहेर केली आहेत. या यादीत भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पाचव्या (Rohit Sharma) क्रमांकावर आहे. रोहितने विदेशात एकूण 21 शतके केली आहेत. भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. सेहवागनं त्याच्या काळात अनेक गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला होता. सलामीला येऊन संघाला वेगवान सुरुवात करून देण्यात सेहवाग माहीर होता. सेहवागनं विदेशात एकूण 20 शतके केली आहेत.

माजी खेळाडूंचाही दबदबा

या यादीत सातव्या क्रमांकावर सुनील गावस्कर आहेत. सुनील गावस्कर यांनी त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीत विदेशात एकूण 18 शतके केली आहेत. त्यांच्यानंतर या यादीत आठव्या क्रमांकावर शिखर धवन आहे. शिखरने विदेशात एकूण 17 शतके केली आहेत. शिखर धवन आता भारतीय संघात दिसत नाही. सलामीला फलंदाजी करताना त्याने अनेक विक्रम केले आहेत.

IND vs SL: गंभीर रोहितला धक्का, 27 वर्षांनंतर श्रीलंकेने जिंकली मालिका

follow us
  • fb
  • instagram
  • youtube