ENGW vs AUSW: टॅमी ब्युमॉन्टचे शानदार शतक, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत इंग्लंडचे दमदार पुनरागमन
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला अॅशेस कसोटी सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 473 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडचा संघ फलंदाजी करत आहे. टॅमी ब्युमॉन्टने इंग्लंडसाठी चांगली कामगिरी केली. त्याने शतक झळकावले. ब्युमॉन्टच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने अवघे 2 गडी गमावून 200 धावांचा टप्पा पार केला. संघाची सुरुवात खराब झाली. परंतु टॅमी ब्युमॉन्टच्या शतकामुळे इंग्लंडने सामन्यात पुनरागमन केले. (engw-vs-ausw-tammy-beaumont-hit-century-for-england-women-against-australia-nottingham-test)
ब्युमाँट आणि एम्मा लॅम्ब इंग्लंडकडून सलामीला आल्या. यादरम्यान लॅम्ब अवघ्या 10 धावा करून बाद झाली. यानंतर कॅप्टन हीदर नाईट फलंदाजीला आली. त्याने ब्युमाँटसोबत चांगली भागीदारी केली. नाइटने 91 चेंडूंचा सामना करत 57 धावा केल्या. या खेळीत तीने 9 चौकारही मारले. त्याचवेळी ब्युमॉन्टने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. वृत्त लिहेपर्यंत तीने 114 धावा केल्या होत्या. ब्युमॉन्टने 169 चेंडूंचा सामना करत 19 चौकार मारले. नेट सेव्हियर 55 धावा करून खेळत होती.
‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र’ योजनेसाठी इफ्को टोकियो विमा कंपनीची निवड…
विशेष म्हणजे प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 473 धावा केल्या होत्या. एलिस पॅरीने संघाकडून 99 धावांची शानदार खेळी केली. मात्र, तिची शतकी खेळी हुकली. पॅरीने 153 चेंडूंचा सामना करत 15 चौकार मारले. सदरलँडने नाबाद शतक झळकावले. तीने 184 चेंडूंचा सामना करताना 137 धावा केल्या. सदरलँडच्या या खेळीत 16 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. ताहिला मॅकग्राने 83 चेंडूत 61 धावा केल्या. मुनी अवघ्या 33 धावा करून बाद झाली. लिचफिल्डने 23 धावांचे योगदान दिले.