आता 16 नंबरची जर्सी दिसणारच नाही; हॉकी इंडियाच्या निर्णयाचं कराल कौतुक

आता 16 नंबरची जर्सी दिसणारच नाही; हॉकी इंडियाच्या निर्णयाचं कराल कौतुक

PR Sreejesh : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाची कामगिरी (Indian Hockey) चांगली राहिली. या स्पर्धेत गोलकीपर पीआर श्रीजेशच्या (PR Sreejesh) कामगिरीचं मोठं कौतुक झालं या स्पर्धेनंतर श्रीजेश पुन्हा मैदानावर दिसणार नाही. याचं कारण म्हणजे श्रीजेशने हॉकीतून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या निर्णयानंतर हॉकी इंडियानेही एक मोठा निर्णय घेतला आहे. पीआर श्रीजेश ज्या 16 नंबरची जर्सी घालत होता ती जर्सी रिटायर्ड करण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतला आहे.

Paris Olympics 2024: चक दे इंडिया ! भारताला हॉकीमध्ये सलग दुसरे कांस्यपदक, स्पेनचा 2-1 ने धुव्वा

पीआर श्रीजेशने नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. संघाला सलग दुसरे पदक मिळवून देण्यात श्रीजेशचा मोठा वाटा होता. या स्पर्धेनंतर त्याने निवृत्तीचा घोषणा केली होती. यानंतर श्रीजेशचा सन्मान करण्याच्या उद्देशाने तो सामन्या दरम्यान परिधान करत असलेली 16 नंबरची जर्सीही निवृत्त करण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतला.

या निर्णयाची माहिती देताना हॉकी इंडियाचे महासचिव भोला नाथ सिंह म्हणाले, जवळपास दोन दशके 16 नंबरची जर्सी वापरणारे श्रीजेश आता ज्यूनियर हॉकी संघाच्या राष्ट्रीय कोच पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. हॉकी संघातील त्याची 16 नंबरची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा निर्णय फक्त सिनियर संघासाठी आहे. ज्यूनियर हॉकी संघात 16 नंबरची जर्सी राहिल.

हॉकीपटू पीआर श्रीजेशची निवृत्तीची घोषणा! पॅरिस ऑलम्पिक 2024 ठरणार शेवटची स्पर्धा

स्पेनचा पराभव करत जिंकलं कांस्यपदक

भारतीय पुरुष हॉकी संघाने (hockey team India) पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत स्पेनचा 2-1 ने धुव्वा उडवत कांस्यपदकाला ( bronze) गवसणी घातली होती. टोक्यो ऑलिम्पिकनंतर दुसऱ्यांदा भारताला कांस्यपदक मिळाले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी आक्रमक खेळ दाखविला. परंतु एकाही संघाला गोल करता आला नाही. दुसरा क्वार्टरच्या तिसऱ्या मिनिटाला स्पेनच्या खेळाडूने गोल करत 1-0 ने आघाडी घेतली होती. तर दुसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटाला भारताचा कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करत 1-1 ने बरोबरी साधली होती. तर तिसऱ्या क्वार्टरमध्ये कर्णधार हरमनप्रीतने शानदार पेनल्टी स्ट्रोकवर तिसऱ्या मिनिटाला गोल करत भारताला 2-1 ने आघाडी मिळवून दिली होती.

भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंहने 30 व्या आणि 34 व्या मिनिटाला गोल केले. हे पदक जिंकत 52 वर्षानंतर हॉकी टीमने ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकण्याची किमया करून दाखवली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube