फायनल अन् सेमीफायनलमध्येच का होतो टीम इंडियाचा पराभव? दिग्गज खेळाडूने सांगितले कारण

फायनल अन् सेमीफायनलमध्येच का होतो टीम इंडियाचा पराभव? दिग्गज खेळाडूने सांगितले कारण

Team India ICC Tournament :  गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेट संघाला सातत्याने आयसीसी स्पर्धेच्या सेमीफायनल व फायनलमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताने शेवटची आयसीसी ट्रॉफी 2013 साली जिंकली होती. 2013 साली महेंद्रसिंह धोनी कर्णधार असताना इंग्लंड येथे झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारताने यजमान इंग्लंडलाच हरवून विजय मिळवला होता. मात्र, त्यानंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलेले नाही. मागील दहावर्षामध्ये भारताला आयसीसी ट्राफी जिंकता आलेली नाही. यावर आता भारतीय संघाचा माजी कोच रवी शास्त्रीने थेट उत्तर दिले आहे.

रवी शास्त्री ही मागील काही वर्षे भारतीय क्रिकेट संघाच मुख्य कोच होता. विशेष करुन विराट कोहली कर्णधार असताना त्याचे विराटचे सूर चांगले जुळल्याची चर्चा होती. पण जेव्हा विराटला कर्णधार पदावरुन दूर करण्यात आले, त्याच काळात रवी शास्त्रीचीदेखील मुख्य कोचपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. पण त्याने आता भारतीय संघाचा या अपयाशामागील कारण सांगितले आहे.

MS धोनीला कँडी क्रश खेळताना पाहिलं अन् तीन तासात 30 लाख चाहते तुटून पडले…

रवी शास्त्री म्हणाला की, भारतीय संघाच्या बाद फेरीतील पराभवाचे खापर शंभर टक्के खेळाडूंवर फोडणे योग्य नाही. मात्र, भारतीय संघ चांगला असून महान खेळाडूंची फौज आहे. पण अनेकदा खराब कामगिरीमुळे आयसीसी स्पर्धांमध्ये निराशा येते, असे तो म्हणाला. तसेच भारताव्यतिरिक्त, ऑस्ट्रेलिया तिन्ही आयसीसी ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरतो, परंतु फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघ बाद फेरीत पराभूत होतो, असे त्याने सांगितले.

रवी शास्त्री म्हणाला की, मी भारतीय संघाला चोकर्स म्हणणार नाही. आमचा संघ उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत पोहोचला, पण हरला. आमचा संघ मोठ्या प्रसंगी चुकतो, पण त्यासाठी मी कोणत्याही वैयक्तिक खेळाडूला दोष देणार नाही. यासाठी मी संघातील सर्व खेळाडूंना जबाबदार धरतो.

600 गाड्यांच्या ताफ्यासह बीआरएसचं वादळ सोलापूरच्या दिशेने; महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठे धक्के बसणार?

तसेच विश्वचषक फायनल असो किंवा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल, तुमच्या फलंदाजांना शतक झळकावायचे आहे, मग तुम्ही तुमच्या गोलंदाजांना चांगली संधी देऊ शकाल. जर तुम्ही हे करू शकत नसाल, तर किमान 3 खेळाडूंना पन्नास धावांचा आकडा पार करावा लागेल, तर तुमच्यासाठी संधी निर्माण होतील, असे त्याने सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube