WTC Final: रोहित शर्मा स्वस्तात परतला, पहा… टीम इंडियाच्या कर्णधाराची विदेशी भूमीवर कामगिरी

  • Written By: Published:
WTC Final: रोहित शर्मा स्वस्तात परतला, पहा… टीम इंडियाच्या कर्णधाराची विदेशी भूमीवर कामगिरी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. ओव्हलच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने आहेत. नाणेफेक हारल्यानंतर कांगारूंनी प्रथम फलंदाजी करत 469 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड  (Travis Head) आणि स्टीव्ह स्मिथने (Steven Smith)  शतके झळकावली. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या 469 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) शिवाय शुभमन (Shubhaman Gill) गिल आणि चेतेश्वर पुजारा (Cheteswar Pujara) , विराट कोहली (Virat Kohali) स्वस्तात बाद झाले.(ind-vs-aus-wtc-final-rohit-sharma-out-on-15-runs-by-pat-cummins-world-test-championship-final)

टीम इंडियाच्या सलामीवीरांनी निराशा केली

रोहित शर्मा 26 चेंडूत 15धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने रोहित शर्माला आपला शिकार बनवले. तर शुभमन गिल 15 चेंडूत 13 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शुभमन गिलला स्कॉट बाउलँडने बाद केले. टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर 30 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले.

 

रोहित शर्माची आकडेवारी काय सांगते?

आकडेवारी सांगते की, रोहित शर्माने आतापर्यंत 50 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने भारतीय मैदानावर 24 सामने खेळले आहेत, तर परदेशी भूमीवर 26 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. रोहित शर्माने परदेशी मैदानावर 26 कसोटी सामन्यांमध्ये 1377 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहित शर्माची सरासरी 31.30 आहे तर स्ट्राइक रेट 46.12 आहे. त्याचबरोबर रोहित शर्माची परदेशी भूमीवर सर्वोत्तम धावसंख्या 127 धावा आहे. रोहित शर्माने परदेशी भूमीवर 3 वेळा शतकाचा टप्पा ओलांडला आहे.

रोहित शर्माची कसोटी कारकीर्द…

रोहित शर्माच्या एकूण कसोटी विक्रमावर नजर टाकली तर या खेळाडूने 50 सामने खेळले आहेत. या 50 कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या बॅटने 3379 धावा केल्या आहेत. रोहित शर्माची कसोटी फॉरमॅटमध्ये सरासरी 45.66 आहे तर स्ट्राइक रेट 55.94 आहे. याशिवाय या फॉरमॅटमध्ये 9 शतकांव्यतिरिक्त त्याने 14 वेळा पन्नास धावांचा आकडा पार केला आहे. तर सर्वोत्तम धावसंख्या 212 धावा आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube