Emerging Asia Cup 2023 : बांग्लादेशला हरवत भारताने पटकावला आशिया कपचा किताब

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 06 21T130905.379

Emerging Asia Cup 2023 : हाँगकाँगमध्ये खेळला जाणारा उदयोन्मुख महिला आशिया कप 2023 भारतीय अ महिला संघाने जिंकला आहे. अंतिम सामन्यात भारतीय अ महिला संघाने बांगलादेशचा 31 धावांनी पराभव केला. विजेतेपदाच्या लढतीत भारतीय संघाने प्रथम खेळताना 20 षटकांत 7 गडी गमावून 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संपूर्ण संघ 96 धावांत गारद झाला. भारतीय महिला संघाकडून श्रेयंका पाटीलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.

भारतीय महिला अ संघाने अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाकडून डावाची सुरुवात करणाऱ्या श्वेता सेहरावत आणि उमा छेत्री यांनी पहिल्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी केली. यानंतर वृंदा दिनेशने 36 तर कनिका आहुजाने 30 धावा केल्या.

शिंदे-फडणवीस सरकार गाफील, आणखी एक प्रकल्प गुजरातला; रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!

यामुळे भारतीय महिला अ संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून 127 धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेश महिला अ संघाकडून गोलंदाजीत नाहिदा अक्‍टर आणि सुलताना खातून यांनी 2-2 विकेट घेतल्या.

128 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश अ महिला संघाने सुरुवातीपासूनच विकेट्स गमावल्या. 51 धावसंख्येपर्यंत निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या सामन्यात बांगलादेश अ महिला संघ 19.2 षटकात 96 धावा करत गारद झाला. संघातील केवळ 3 फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले.

Yoga Day Celebration: भारत-चीन सीमेजवळील सैनिकांचा योगा, पाहा फोटो

फिरकी गोलंदाज श्रेयंका पाटील हिचा पुन्हा एकदा भारतीय महिला संघाचा चमत्कार पाहायला मिळाला. श्रेयंकाने 4 षटकात केवळ 13 धावा देत 4 बळी घेतले. याशिवाय मन्नत कश्यपने 3 तर कनिका आहुजाने 2 बळी घेतले.

Tags

follow us