भारताला धक्का, पहिल्याच दिवशी आफ्रिकेची शानदार कामगिरी; 6 विकेट गमावून केल्या 247 धावा

IND vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असणाऱ्या दोन कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून गुवाहाटी येथे खेळवला जात आहे.

  • Written By: Published:
IND Vs SA 2nd Test

IND vs SA 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असणाऱ्या दोन कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून गुवाहाटी येथे खेळवला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी करत पहिल्या दिवसाच्या खेळाअखेर आफ्रिकेने 6 विकेट गमावून 247 धावा केल्या आहेत. आफ्रिकेकडून वॉरेन 11 आणि मुथुस्वामी 25 धावांवर खेळत आहे.

या सामन्यात टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली. एडेन मार्कराम (Aiden Markram) आणि रायन रिकेल्टनने (Ryan Rickelton) पहिल्या विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. पहिल्या सत्राच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने मार्करामला बाद करून भारताला (IND vs SA 2nd Test) पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. मार्करामने 81 चेंडूत 5 चौकारांसह 38 धावा केल्या. तर दुसऱ्या सत्रात भारताने शानदार गोलंदाजी करत दुसऱ्या सत्राच्या तिसऱ्या चेंडूवर आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. कुलदीप यादवने  रिकेल्टनला झेलबाद केले. आफ्रिकेने दुसऱ्या सत्रात देखील चांगली खेळी करत भारताला विकेट दिले नाही.

82 धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर  ट्रिस्टन स्टब्स आणि कर्णधार टेम्बा बावुमा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. 41 धावा केल्यानंतर जडेजाने बावुमाला बाद केले. कुलदीप यादवने स्टब्सला बाद केले. तर दिवसाअखेर खेळ संपेपर्यंत  आफ्रिकेने 6 विकेट गमावून 247 धावा केल्या आहेत. आफ्रिकेकडून वॉरेन 11 आणि मुथुस्वामी 25 धावांवर खेळत आहे. तर पहिल्या दिवशी भारताकडून कुलदीप यादवने 3 विकेट घेतल्या आहे तर बुमराह, जाडेजा आणि सिराजने प्रत्येकी  एक-एक विकेट घेतली.

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलच्या अनुपस्थितीत दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहे. या सामन्यासाठी साई सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकावर संधी देण्यात आली आहे, तर अक्षर पटेलच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेनेही एक बदल केला आहे. कॉर्बिन बॉशच्या जागी सेनुरन मुथुस्वामीला संधी देण्यात आली आहे.

Ashes 2025 : स्टार्कनंतर ट्रॅव्हिस हेडचा कहर; ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी मारली बाजी

follow us