Cricket : भारत-अफगाणिस्तान भिडणार! जय शाह याांची मोठी घोषणा

  • Written By: Published:
Cricket : भारत-अफगाणिस्तान भिडणार! जय शाह याांची मोठी घोषणा

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारत-अफगाणिस्तान वनडे मालिकेबाबत मोठी माहिती दिली आहे. यावर्षी होणारी वनडे मालिका पुढे ढकल्यात आल्यानंतर आता ही मालिका जानेवारी 2024 मध्ये खेळविण्यात येणार आहे.  शुक्रवारी बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीची बैठक झाली, त्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले. (india afghanistan odi series schedule confirmed by jay shah ind vs afg)

या वर्षी जूनमध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार होती, परंतु दोन्ही देशांच्या बोर्डांनी परस्पर सहमतीने मालिकेची तारीख पुढे ढकलण्याबाबत निर्णय घेतला होता. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार भारत-अफगाणिस्तान मालिका 23 जून ते 30 जून या कालावधीत होणार होती, परंतु आता ही मालिका पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये होणार आहे.

बीसीसीआयच्या बैठकीनंतर जय शाह काय म्हणाले?

याशिवाय जय शाह म्हणाले की, भारताच्या द्विपक्षीय सामन्यांचे मीडिया अधिकार ऑगस्ट महिन्यापर्यंत निश्चित केले जातील. हे मीडिया अधिकार पुढील 4 वर्षांसाठी असतील. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, नवीन मीडिया अधिकार भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपासून लागू होतील. एकदिवसीय विश्वचषकानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका खेळवली जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासोबतच जय शाह म्हणाले की बीसीसीआय लवकरच आशियाई क्रीडा 2023 साठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कोचिंग स्टाफची नावे जाहीर करेल.

BCCI Policy : परदेशी लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना बीसीसीआयचा दणका; आणणार नवी पॉलिसी

‘भारतीय संघ दोन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकेल’

जय शाह म्हणाले की बीसीसीआयने आशियाई क्रीडा 2023 साठी भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला मान्यता दिली आहे. आम्ही आमचे दोन्ही संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत पाठवू. ते म्हणाले की, आशियाई खेळ 2023 साठी भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ पाठवण्याच्या प्रस्तावाला बीसीसीआयच्या सर्वोच्च समितीकडून हिरवा सिग्नल मिळाला आहे. यासोबतच या दोन्ही प्रकारात भारतीय संघ सुवर्णपदक जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube