भारताचा पराभव केला पण मिळाली आयसीसीची नोटीस; आयर्लंडच्या गोलंदाजामुळे नवा वाद
India vs Ireland Women : आयर्लंड महिला क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात एकदिवसीय क्रिकेट मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने सहज जिंकला. या सामन्यात मात्र आयर्लंडच्या फिरकी गोलंदाजाची चर्चा सुरू झाली आहे. कारण, या गोलंदाजाची गोलंदाजी करण्याची शैली वादात सापडली आहे. आयसीसीने आयर्लंडची गोलंदाज एमी मॅकग्वायर प्रकरणी आयर्लंड क्रिकेटला नोटीस पाठवली आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्यात एमी मॅग्वायरने भारता विरुद्ध चांगली गोलंदाजी केली. या सामन्यात तिने 57 धावा देत तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, तिची गोलंदाजी करण्याची शैली आता वादात सापडली आहे. एमी मॅग्वायरची गोलंदाजी करण्याची शैली नियमात बसत नाही अशी शंका उपस्थित करण्यात आली. सामनाधिकाऱ्यांनी तसा अहवाल आयर्लंड संघाच्या व्यवस्थापनाला पाठवून देण्यात आला आहे.
भारताची विजयी सलामी! पहिल्याच सामन्यात आयर्लंडवर एकतर्फी विजय
या अहवालाची दखल घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयर्लंड क्रिकेटला अधिकृत नोटीस दिली आहे. यामध्ये अनधिकृत गोलंदाजी शैलीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यानंतर कदाचित एमीला आयसीसीच्या टेस्टिंग सेंटरमध्ये जाऊन गोलंदाजी शैलीची तपासणी करावी लागेल. येथे गोलंदाजी आयसीसीच्या नियमानुसार आहे की नाही याची तपासणी होईल. याचा अहवाल येईपर्यंत तिला क्रिकेट खेळता येईल.
दरम्यान, या प्रकरणात आयर्लंड क्रिकेट एमीला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. क्रिकेट आयर्लंडच्या अधिकारी ग्रॅमी वेस्ट यांनी सांगितले की स्टाफ सदस्य आणि खेळाडू मॅग्वायरच्या पाठीशी राहणार आहोत. एमी निश्चितच चांगल्या गोलंदाजी शैलीसह येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, आता रविवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एमी मॅग्वायरला विश्रांती देण्यात आली आहे.
आयसीसीचा मोठा निर्णय! आता टी 20 वर्ल्डकपमध्ये दिसणार 16 क्रिकेट टीम