40 लाखांची फसवणूक, स्मृती मानधना कनेक्शन अन् पलश मुच्छलने पाठवली 10 कोटींची मानहानीची नोटीस
Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाशी लग्न रद्द झाल्यानंतर गायक पलाश मुच्छल सोशल मीडियावर काहींना काही कारणाने चर्चेत आहे.
Palash Muchhal : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाशी लग्न रद्द झाल्यानंतर गायक पलाश मुच्छल सोशल मीडियावर काहींना काही कारणाने चर्चेत आहे. नुकतंच स्मृती मानधनाच्या एका मित्राने फसवणूक केल्याचा आरोप केला होता मात्र आता या प्रकरणात पलाश मुच्छलने कायदेशीर मार्ग वापरत सांगली येथील निर्माते विज्ञान माने यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. त्याने 10 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली असल्याने या प्रकरणात आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे पलाशने इंस्टाग्रामवरुन स्मृती मानधनासोबत असणारे सर्व पोस्ट देखील डिलीट केले आहे.
पलाश मुच्छलने (Palash Muchhal) आपल्या इंस्टाग्रामवर या आरोपांना उत्तर देत लिहिले की, माने यांनी केलेले आरोप निराधार आहेत आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी वकिलांशी सल्लामसलत करणार आहे. तर दुसरीकडे पलाशने आता दुसऱ्या एका पोस्टमध्ये जाहीर केले आहे की, माने यांना मानहानीसाठी 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
पलाशने लिहिले आहे की, माझे वकील श्रेयांश मिठारे यांनी सांगली येथील रहिवासी विद्यायन माने यांना 10 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे, कारण त्यांनी केलेले आरोप खोटे आहेत आणि माझी प्रतिमा आणि चारित्र्य खराब करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून केले आहेत.काही दिवसांपूर्वी माने यांनी सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र पोलिसांकडे तक्रार केली होती की पलाश यांनी त्यांची 40 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. मात्र आतापर्यंत या प्रकरणात कोणताही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.
लग्राच्या दिवसी पलाश मुच्छल नको त्या अवस्थेत पकडला गेला
तर दुसरीकडे एक मुलाखतीमध्ये बोलताना माने यांनी धक्कादायक दावा केला होता. लग्राच्या दिवसी पलाश मुच्छल दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडला गेला होता आणि त्याला भारतीय महिला क्रिकेटपटूंनी मारहाण केली होती असा दावा माने यांनी एका मुलाखतीमध्ये केला आहे.
पलाश आणि स्मृती मानधनाचे लग्न रद्द
पलाश आणि मानधनाचे (Smriti Mandhana) लग्न बऱ्याच काळापासून डेटिंग करत होते. भारतीय संघाने 2 नोव्हेंबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यानंतर मानधन आणि पलाशचे लग्न होणार होते. हळदी आणि मेहंदीसह अनेक लग्न विधी आधीच पूर्ण झाले होते. लग्नाच्या दिवशी सकाळी लग्न पुढे ढकलल्याची बातमी समोर आली. सुरुवातीला असे वृत्त आले होते की मानधनाचे वडील आजारी आहेत, ज्यामुळे अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली. नंतर, जोडप्याने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे रद्द करण्याची घोषणा केली.
धक्कादायक, नालासोपाऱ्यात आईकडून 15 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या
