बॅडलक टीम इंडिया! हॉकीत भारतीय संघाचा पराभव, सुवर्णपदक हुकलं
Paris Olympics 2024 : ऑलिम्पिक स्पर्धेतील हॉकी सामन्यात (Paris Olympics 2024) बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चारणाऱ्या भारतीय हॉकी (Indian Hockey) संघाचा प्रवास सेमी फायनलमध्येच थांबला आहे. काल झालेल्या सेमी फायनल सामन्यात जर्मनी संघाने (Germany) भारताचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या पराभवा बरोबरच भारताची हॉकीत सुवर्णपदकाची संधीही आता हुकली आहे.
हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. आता सुवर्णपदक मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. या सामन्यात जर्मनीने भारताचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. हा पराभव झाल्यानंतर सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या आहेत. मात्र अजूनही ब्राँझ पदक जिंकण्याची संधी भारताला आहे. पुढील सामना कांस्यपदकासाठी होई. उद्या 8 ऑगस्ट रोजी भारत आणि स्पेन यांच्यात सामना होईल. हा सामना जर भारताने जिंकला तर कांस्यपदक मिळेल.
Paris Olympics 2024: भारताच्या लेकीची कमाल ! विनेश फोगट फायनलमध्ये, पदकही पक्के
या सामन्यात पहिल्या क्वार्टरचा खेळ संपेपर्यंत भारताकडे आघाडी होती. परंतु, पुढल्या टप्प्यात जर्मनीने एक गोल करत सामन्यात रंगत आणली. यानंतर मात्र भारतीय संघाला जास्त संघर्ष करावा लागला तरी देखील वापसी करता आली नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीने 2-1 अशी आघाडी घेतली होती. तिसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र जर्मनीने भारताला गोल करण्याची संधीच दिली नाही.
पुढे पेनल्टी कॉर्नर प्रकारात भारतीय खेळाडूंनी मोठ्या कष्टाने एक गोल केला. सुखजीतने हा गोल केला त्यामुळे सामना (Paris 2024) बरोबरीत आला. विजयी गोल करण्यात भारताला यश आलं नाही. सातव्या आणि आठव्या मिनिटाला भारताला सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले तिसऱ्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने एक गोल केला. पुढचा गोल करण्याचे भरपूर प्रयत्न केले मात्र जर्मनीने सर्व प्रयत्न रोखले.
सामन्याच्या अखेरच्या सहा मिनिट अगोदर जर्मनीने तिसरा गोल केला. यानंतर जर्मनीची 3-2 अशी आघाडी झाली. यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंनी आणखी गोल करण्याचे भरपूर प्रयत्न केले मात्र यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे महत्वाचा सामना गमवावा लागला. याआधी भारताने अटीतटीच्या सामन्यात ग्रेट ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया(Australia) चा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात विजयी होऊन फायनलमध्ये प्रवेश मिळेल असे वाटत होते. मात्र जर्मनीने भारताचा विजय रथ रोखला.
Paris Olympics 2024 मध्ये चक दे! इंडिया, न्यूझीलंडचा उडवला धुव्वा