माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकीय आखाड्यात; आजच करणार भाजपात प्रवेश

माजी क्रिकेटपटू केदार जाधव राजकीय आखाड्यात; आजच करणार भाजपात प्रवेश

Kedar Jadhav in Politics : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव (Kedar Jadhav) राजकारणात पदार्पण करणार. लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केदार आज मुंबईत भारतीय जनता पार्टीत प्रवेश करील अशी माहिती आहे. मुंबईतील पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा होईल. याआधी अनेक क्रिकेटपटूंनी राजकीय मैदान गाजवलं आहे. अगदी अलीकडील उदाहरण द्यायचं झालं तर गौतम गंभीरचं देता येईल. गौतम गंभीर भाजपाचा खासदार राहिला आहे. यानंतर आता केदार जाधव सुद्धा त्याची राजकारणातील नवी इनिंग सुरू करण्यास सज्ज झाला आहे.

केदार जाधव हा मूळचा पुण्यातील आहे. महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळल्यानंतर त्याची थेट भारतीय संघात निवड झाली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्याला मिळाली. केदारने टीम इंडियाकडून एकूण 73 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 42.09 च्या सरासरीने 1389 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत केदारने एकूण 27 विकेट्स घेतल्या आहेत.

टीम इंडियाचा सुपर फिनिशर केदार जाधवने धोनी स्टाईलने जाहीर केली निवृत्ती

टी 20 सामन्यात मात्र केदारला फारशी संधी मिळाली नाही. केदारला त्याच्या कार्यकाळात फक्त 9 टी 20 सामने खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यांत केदारने 20.33 च्या सरासरीने 122 धावा केल्या आहेत. कसोटीत तर केदारची पाटी कोरीच राहिली आहे. केदार जाधवला त्याच्या कारकीर्दित एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. फेब्रुवारी 2020 मध्ये केदार टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर केदारचे पुन्हा संघात पुनरागमन झाले नाही.

जून 2024 मध्ये केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती जाहीर केली होती. केदार जाधवने माजी कर्णधार एमएस धोनीच्या स्टाईलने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती . यानंतर आता केदारला राजकारणाचे वेध लागले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कॉमेंट्रीटर केदार जाधवला ‘अच्छे दिन’; आयपीएलच्या ‘या’ संघात परतला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube