WTC विजेत्या संघावर होणार धनवर्षाव, ICC कडून प्राइज मनी घोषित; रक्कम ऐकून व्हाल थक्क!

WTC Final Prize Money 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या बक्षीसाच्या रकमेची (World Test Championship) घोषणा झाली आहे. फायनल सामना 11 ते 15 जून दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. यावेळी विजेता होणाऱ्या संघासाठी बक्षिसाच्या रकमेची घोषणा झाली आहे. यावेळची रक्कम मागील वेळच्या तुलनेत 125 टक्क्यांनी जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या टीमला तब्बल 30 कोटी 8 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.
विजेत्या संघाला बंपर प्राइज मनी
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप विजेत्याला जवळपास 30 कोटी 8 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला 18.5 कोटी रुपये मिळतील. मागील वेळी उपविजेत्या संघाला फक्त 6.8 कोटी रुपये मिळाले होते. आता बक्षिसाच्या रकमेत भरघोस वाढ झाली आहे. या माध्यमातून टेस्ट क्रिकेटला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
चांगली गोष्ट म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकापासून शेवटच्या क्रमांकापर्यंत कोणताच संघ रिकाम्या हाताने परतणार नाही. मागील वेळी फायनल सामना खेळलेला भारतीय संघ यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिला तरी देखील बक्षीस म्हणून संघाला 12 कोटी रुपये मिळणार आहेत.
ब्रेकिंग : BCCI चा मोठा निर्णय; निवृ्ृतीनंतरही कोहली अन् रोहितला मिळणार A+ श्रेणीतील सुविधा
अन्य संघांनाही मिळणार गिफ्ट..
आयसीसीने फक्त विजेता आणि उपविजेत्या संघावरच नाही तर अन्य संघांवरही पैशांचा वर्षाव केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय संघाला 12 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच नवव्या क्रमांकावर राहिलेल्या पाकिस्तान संघाला 41 लाख रुपये मिळणार आहेत. तर 2021 मधील विजेत्या आणि यावेळी चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या न्यूझीलंड संघाला 10.2 कोटी रुपये मिळणार आहेत.
पाचव्या क्रमांकावरील इंग्लंडला 8.2 कोटी रुपये, सहाव्या क्रमांकावरील श्रीलंकेला 7.1 कोटी रुपये, सातव्या क्रमांकावरील बांग्लादेशला 6.1 कोटी रुपये आठव्या क्रमांकावरील वेस्टइंडिजला 5.1 कोटी रुपये मिळणार आहेत. याआधी 2021 आणि 2023 मधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप विजेत्या संघाला बक्षीस म्हणून 13.7 कोटी रुपये मिळाले होते.
गोल्डन बॉय नीरज चोप्राला मानाचं पद.. टेरिटोरियल आर्मीत बनला लेफ्टनंट कर्नल