Manoj Jarange Patil : ओबीसी मंडल चॅलेंज करण्याबाबत मला कशाला चॅलेंज देतो, गप मर ना, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शेवटचं सांगितलं आहे. दरम्यान, जालन्यात मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण सुरु करणार असल्याचंही स्पष्ट […]
Manoj Jarange On Chagan Bhujbal : छगन भुजबळ माझ्या नादी लागू नको, नाहीतर मंडल आयोग जाईल, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan bhujbal) यांनी धमकावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून अध्यादेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावरुन भुजबळ आणि जरांगे यांच्यात […]
Chagan Bhujbal News : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर राज्य सरकारकडून कुणबीच्या नोंदी सापडण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून अनेक कुणबी नोंदी असलेले पुरावे सापडले आहेत. राज्यभरातून 54 लाख नोंदी आढळून आल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी या […]
Chagan Bhujbal : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भुजबळांवर (Chagan Bhujbal) भाजपमध्ये जाणार असल्याचा खळबळजनक दावा केल्यानंतर भुजबळ यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की, ‘दमानियांना ही माहिती कशी मिळाली? हे मला माहित नाही. तसेच मला कुठल्याही पदाची हौस नाही. माझ्या पक्षात मी मंत्री आहे. माझी कोणतीही घुसमट सध्या पक्षात होत नाही.’ […]
Vijay Wadettivar News : मंत्रिमंडळाला विश्वासात न घेताच मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश काढण्यात आला असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) यांनीही बोट ठेवलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर ओबीसी नेत्यांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात येत आहे. आधी छगन भुजबळांनी या अध्यादेशाला कडाडून विरोध दर्शवला त्यानंतर आता विजय वडेट्टीवारांनीही यावर आक्षेप घेतला आहे. मुंबईत […]
Sunil Tatkare News : विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्येही एकटेच असल्याची जळजळीत टीका अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेते एकवटल्याचं चित्र आहे. अशातच छगन भुजबळांच्या भूमिकेला विजय वडेट्टीवारांनी समर्थन दिल्यानंतर सुनिल तटकरे यांनी वडेट्टीवारांच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. […]
Bachhu Kadu : कुणबी नोंदी बोगस असल्याचं वाटतं तर तिथं जावं, या शब्दांत प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता जरांगे-भुजबळ वादात बच्चू कडू मैदानात उतरुन […]
Chagan Bhujbal : शिवेसना अपात्र प्रकरणात व्हिपच्या मुद्द्यावर अनेक प्रश्न होते, मात्र राष्ट्रवादीत व्हिपचा मुद्दाच नाही. पूर्वीचा जो व्हिप होता तोच आत्ताही असल्याचं मोठं विधान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी (Chagan Bhujbal) केलं आहे. दरम्यान, अपात्र आमदार प्रकरणाचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. त्यानंतर विरोधकांकडून शिवसेनेसारखंच राष्ट्रवादीचंही होणार असल्याच्या […]
Ajit Pawar News : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. दरम्यान, पुण्यातील भिडेवाडा येथील महात्मा फुलेंच्या राष्ट्रीय स्मारकाच्या विकास आराखड्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी अजित पवार यांनी […]