नाशिकची जागा कोणाची! भुजबळांसोबतच्या चर्चेनंतर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

नाशिकची जागा कोणाची! भुजबळांसोबतच्या चर्चेनंतर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

Nashik Loksabha : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election) वातावरण तापलं आहे. महायुतीसह महाविकास आघाडीच्या अनेक जागा जवळपास निश्चित झाल्या आहेत. मात्र, राज्यातील काही जागांवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यापैकीच नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेकडे असताना राष्ट्रवादीने दावा ठोकल्याने नाशिकच्या जागेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अशातच आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांची भेट घेतली. या भेटीनंतर नाशिकची जागा शिवसेनेकडेच राहणार असून नाशिकच्या उमेदवाराबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच (Cm Eknath Shinde) अंतिम निर्णय घेणार असल्याचं ठणकावून सांगितलं आहे. बावनकुळेंच्या विधानानंतर काही प्रमाणात संभ्रम दूर झाला असल्याचं बोललं जात आहे.

चालायचं शिकवणाऱ्यालाच लाथा मारायच्या का? ठाकरेंचा अजितदादांना खोचक सवाल

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, नाशिक लोकसभेबाबत छगन भुजबळांनीही दावा केला होता. वरिष्ठ पातळीवरही छगन भुजबळांच्या नावाची चर्चा सुरु होती. नाशिकच्या जागेबाबत महायुती म्हणून आम्ही शिवसेनेसोबत आहोत. नाशिकची जागा निवडून आणण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस ताकद लावणार असून 51 टक्के मताने महायुतीचा खासदार निवडून येणार आहे. या जागेबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर असून तेच अंतिम निर्णय घेणार असल्याचं बावनकुळेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

‘PM मोदींनी शरद पवारांना म्हटलं नाही’; ‘भटकती आत्मा’वर विजय शिवतारेंनी मौन सोडलं…

नाशिकच्या जागेसाठी शांतिगिरी महाराजांसोबत आम्हीही चर्चा केली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबचही महाराजांनी चर्चा केली आहे. शिंदेंनी उमेदवार दिला अर्ज भरला की आमचं सगळं ठरलं आहे. महायुती म्हणून 51 टक्क्याने उमेदवार निवडून आणायचा आहे. नाशिकच्या जागेवर शिंदेंनी निर्णय घ्यायचा आहे. महायुती म्हणून आम्ही सोबत पण तेच निर्णय घेणार आहेत. अजून 18 दिवस बाकी आहेत जागा कुठेही जाणार नाही. महायुतीचं मोठं झाड आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी अन् भाजपचे तीन-तीन आमदार आहेत. एकदा जागा फायनल झाली की 18 दिवस खूप आहेत, असं बावनकुळेंनी सांगितलं आहे.

ही निवडणूक जनतेची आहे. देशाचा पंतप्रधान निवडण्याची निवडणूक असून शिंदेंनी कोणताही उमदेवार दिला किंवा महायुतीने कोणताही उमदेवार दिला तो उमेदवार मोदींना मतदान करणार आहे. पालघरमध्ये भाजपचाच उमेदवार देणार आहोत. पुढील दिवसांत पालघरचा उमदेवार भाजप जाहीर करणार असल्याचंही बावनकुळेंनी सांगितलं आहे.

भुजबळांनी एक आव्हान केलंय मोदींच्या विकासाला साथ द्यायची आहे. मोदींसाठी नेहमीच त्यांचं समर्थन राहिलं आहे. अशावेळी ते मोदींच्या विकसित भारताचा संकल्प आहे त्यांचा आधीपासून ते उद्यापर्यंत पाठिंबा असणारच आहे. भुजबळांच्या नावाला कोणाचाच विरोध नाही. नाशिकमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे प्रत्येक समर्थकाला असं वाटत की आपला नेता लोकसभेत जावा. महायुतीत जागांवरुन तडजोड करावी लागते. रामटेकमध्ये सर्वच आमदार भाजपचे असताना शिवसेनेला जागा दिली नाशिकमध्येही हीच परिस्थिती असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

नाशिकच्या जागेसाठी ओबीसी संघटनांसह समता परिषदेकडून भुजबळांनी उमेदवारी मागे घेतल्याने नाराजी व्यक्त केलीयं हे स्वाभाविक आहे, पण त्यांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागे असे आवाहन ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांना केले असल्याचंही बावनकुळेंनी सांगितलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज