बारामती : यंदा बारामती जिंकायचीच, सुप्रिया सुळे यांचा पराभव करुन शरद पवार यांना चितपट करायचेच असा जणू चंग भाजपने आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला आहे. त्यासाठी अजितदादांनी मतदारसंघात जातीने लक्ष घातले आहे. मतदारसंघातील समीकरणे साधण्यावर ते भर देत आहेत. यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटीलही त्यांना मदत करत आहेत. दौंड, इंदापूर, पुरंदर इथले वाद मिटविण्यासाठी […]
Nana Patole : आगामी लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांकडून हालचालींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरुन चर्चा सुरु असून दुसरीकडे महाविकास आघाडीतही जागावाटपावर मॅरेथॉन बैठका सुरु आहेत. अशातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी महाविकास आघाडीचं जागावाटप कधी […]
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) सांगता मुंबईत झाली. त्यानंतर इंडिया आघाडीची सभा मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कवर झाली. या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच काँग्रेसला सोडून गेलेल्या नेत्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. मोदींच्या कुटुंबात ते आणि […]
Nana Patole : लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तारखांची आज घोषणा करण्यात आली. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झाली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असताना आज मणिपूर येथून निघालेली कॉंग्रेसची न्याय यात्रा मुंबईत आली आहे. या यात्रेचं स्वागत करतांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) मोदी सरकारवर जोरदारी टीका केली. पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) […]
सांगली : काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आणि विशाल पाटील या दोघांनीही लोकसभा (Lok Sabha Election) निवडणुकीपूर्वीच अर्धी लढाई जिंकली आहे. परंगपरागत काँग्रेसकडे (Congress) असलेला सांगली (Sangli) मतदारसंघ शिवसेनेकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. मात्र या दोघांनीही दिल्लीपर्यंत धडका मारुन हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांच्या जीवात जीव आला आहे. […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने दोन (Lok Sabha Election) दिवसांपूर्वी दुसरी यादी जाहीर केली होती. पहिली आणि दुसरी यादी मिळून भाजपने आतापर्यंत 267 उमेदवारांची घोषणा केली आहे. या दोन्ही याद्यांवर बारकाईने नजर टाकली तर असे लक्षात येते की भाजप या निवडणुकीत कोणताही धोका पत्करण्याच्या मूडमध्ये नाही. तसेच या याद्यांमध्ये रिपीट फॅक्टर […]
Ravindra Dhangekar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या ( Loksabha Elections 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असून भाजपकडून महाराष्ट्रातील 20 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाली त्यावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी मोहोळ यांना टोला लगावला आहे. धंगेकर म्हणाले की, मोहोळ म्हणत आहेत ते […]
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी आणि भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएने कंबर कसली आहे. भाजपने स्वबळावर 370 हून अधिक तर एनडीएने 400+ जागा मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर इंडिया आघाडीने मिळून भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार केला आहे. त्याचवेळी विविध सर्व्हेंमध्ये भाजपला काहीशी अनुकूल आकडेवारी आणि मतदान मिळत असल्याचे दिसून येत आहे. तर […]
नवी दिल्ली : देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16) दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) तारखांची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा होणार असल्याने राजकीय पक्षांची आणि उमेदवारांची धाकधूक वाढणार असून, विजयासाठी […]