ठाकरेंनी माझा फोन घेणं टाळलं; त्यांच्या मनात नेमकं काय?; पटोलेंनी बोलून दाखवली खदखद

ठाकरेंनी माझा फोन घेणं टाळलं; त्यांच्या मनात नेमकं काय?; पटोलेंनी बोलून दाखवली खदखद

Vidhan Parishad clashes between Congress and Thackeray : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या ( Vidhan Parishad ) निवडणुकीमध्ये काँग्रेस (Congress) आणि ठाकरे ( Thackeray ) गट आमने-सामने आले आहेत. लोकसभेप्रमाणेच ठाकरे यांनी चारही जागेवर परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेसने नाराज व्यक्त केली आहे.

Nilesh Lanke : मतदारसंघाचा विकास कसा करणार? खासदार लंकेंनी सांगितला संपूर्ण प्लॅन

त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी असताना अशाप्रकारे चर्चेच्या अगोदर घोषणा करणे चुकीचे आहे. त्यामुळे ठाकरे गटाने मुंबईतून विधान परिषदेसाठी भरलेले अर्ज कायम ठेवावेत. मात्र कोकण आणि नाशिक शिक्षक उमेदवार ठाकरे यांनी मागे घ्यावेत. अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. तर पटोलेंसह काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे देखील ठाकरे गटाच्या या भूमिकेवर नाराज आहेत.

अजित पवारांच्या वर्चस्वाला धक्का बसणार?; शरद पवारांचे 12 शिलेदार तयार, वाचा लेट्सअप खबरबात

तर ठाकरेंना उमेदवार मागे घेण्याचा निरोप देण्यासाठी मी आज सकाळपासून फोन लावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांच्याकडून कोणताही निरोप येत नाही. तसेच ठाकरेंशी संपर्कही झालेला नाही त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे? हेच कळत नसल्याचं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान या अगोदर लोकसभा निवडणुमध्ये देखील ठाकरे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने कॉंग्रेस नेत्यांसह कार्यकर्ते नाराज झाले होते.

याच कारणावरून सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ते ठाकरे यांचे उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटील यांचा पराभव करत निवडून देखील आले आहेत. त्यानंतर आता आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. लोकसभेप्रमाणेच ठाकरे यांनी चारही जागेवर परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेसने नाराज व्यक्त केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज