- Home »
- Crime
Crime
Pune : कोलकात्यात भेट, पुण्यात प्रेम अन् गुवाहटीत खून : लव्ह ट्रँगलने घेतला बड्या उद्योजकाचा बळी
पुणे : येथील एका व्यावसायिकाची आसाममधील गुवाहाटी (Guwahati) शहरातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुवाहाटी पोलिसांनी (Police) तरुणीसह दोघांना अटक केली आहे. संदीप सुरेश कांबळे (44, रा. येरवडा) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. तर अंजली शॉ आणि विकासकुमार शॉ असे अटक केलेल्या संशयीत आरोपींची नावे आहेत. (A businessman […]
पतीसोबत भांडण, कराडला निघाली पण मिरजला पोहचली; तिथेच बलात्कार अन् कर्नाटकात विक्री
मिरज : पतीसोबत भांडण झाल्यानंतर सासर सोडून कराडला जाणाऱ्या आणि चुकून मिरजला पोहचलेल्या 23 वर्षीय विवाहितेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा, त्यानंतर तिला लग्नासाठी कर्नाटकात नेऊन तिची चार लाखांत विक्री केल्याचा आणि परस्पर लग्न लावून दिल्याचा अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार उघड झाला आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या कृत्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात […]
Ahmednagar News : रोज जेवू घातलं पण पतीच्या अंधत्वाचा फायदा घेत शेजाऱ्याने थेट पत्नीच पळवली
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News ) एक धक्कादायक घटना घडली आहे. अंधपणाचा गैरफायदा घेऊन बायकोला शेजारच्या व्यक्तीने फूस लावून पळवले. तसेच बायकोला पळवणाऱ्या व्यक्तीने अंध पतीला जीवे मारण्याची धमकी देत असताना पोलीस स्टेशनला तक्रार घेतली जात नसल्याने कोल्हार येथील त्या अंध व्यक्तीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेऊन सदर व्यक्तीवर कारवाई करुन पत्नीची सुटका करण्याची […]
आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लोकांची कोट्यवधींची फसवणूक, सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीला अटक
Bhiwani News: राजस्थानमधील डिग, अलवर आणि भरतपूर जिल्ह्यातील काही लोक व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल ( WhatsApp Video call) करून नग्न व्हिडिओ बनवत. त्यानंतर नंतर गुन्हे शाखा दिल्लीत इन्स्पेक्टर आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून पीडितांकडून पैसे उकळायचे. या टोळीने 31 वेगवेगळ्या राज्यातील 752 लोकांना टार्गेट करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. काकाच्या मरणाची वाट पाहतोय, लाज वाटते तुमच्यासोबत […]
पुणे : ACP अशोक धुमाळ यांचे निधन, वरिष्ठांनी झापल्याने आत्महत्या केल्याचा संशय
पुणे : बाल्कनीतून पाय घसरुन पडल्याने जखमी झालेल्या फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक धुमाळ (Ashok Dhumal) यांचे आज (29 जानेवारी) रात्री उशीरा निधन झाले. त्यांच्यावर कात्रज परिसरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. 15 जानेवारी रोजी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बाल्कनीतून पाय घसरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. मात्र पोलिसांकडून (Police) […]
Nashik मध्ये महिला सुरक्षा ऐरणीवर; मोठं पाऊल उचलत पोलिसांनी दिला गंभीर इशारा
Nashik : नाशिकमध्ये (Nashik) महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठं पाऊल उचलत महिलांना शारीरिक किंवा मानसिक त्रास देणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. गेले दोन दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांकडे एका 24 वर्षीय मुलीने व्हाट्सअपवर मेसेज करत तिला एक मुलगा त्रास देत असल्याची माहिती देत मदतीचा आवाहन केलं. त्यामध्ये तिने […]
सिद्दिकीच्या खुनाचा बदला म्हणून मोहोळची गेम? हिंदुत्ववादी संघटनांना अतिरेकी हल्ल्याचा संशय
पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात पुणे पोलिसांना दररोज नवनवीन माहिती हाती लागत आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी रामदास मारणे (Ramdas Marane) उर्फ वाघ्या आणि गुंड विठ्ठल शेलार याच्यासह 17 जणांना अटक केली आहे. तपासातील प्राथमिक माहितीनुसार, मुख्य हल्लेखोर साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मामाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोहोळची हत्या […]
शरद मोहोळ खून प्रकरण : शेलार गॅंगची एक धमकी गॅंगवारसाठी ठरली ठिणगी..?
Sharad Mohol : पुण्यातील कोथरुडमध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची गोळीबारातून खून झाल्याची घटना घडली. काही अज्ञात आरोपींकडून त्याच्यावर भर लग्नाच्या वाढदिवशीच गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जखमी झालेल्या शरद मोहोळचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेला पूर्ववैमनस्याची पार्श्वभूमी असल्याचं बोलंलं जात आहे. खूनामागच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे 2022 मध्ये घडलेला शेलार-मोहोळ गॅंगवार होयं. […]
पत्नी राजकारणात अन् पती कुख्यात गुन्हेगार; शरद मोहोळ गॅंगचा विषय काय?
Sharad Mohol : पुण्यातील कोथरुड परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवर (Sharad Mohol) गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारानंतर जखमी शरद मोहोळवर कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेनंतर पुण्यात दहशतीचं वलय असलेल्या शरद मोहोळ गॅंगचीच चर्चा सुरु झाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सध्या शरद मोहोळ यांच्याच […]
IIT BHU च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, भाजपशी कनेक्शन असलेले तीन आरोपी गजाआड
वाराणसी : आयआयटी बीएचयूच्या (IIT BHU) विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना वाराणसी पोलिसांनी (Varanasi Police) सोमवारी अटक केली. तिन्ही आरोपींची ओळख उघड होताच भारतीय जनता पक्षात घबराटीचे वातावरण आहे. प्रत्यक्षात अटक करण्यात आलेले तीन आरोपी हे भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यांचे जवळचे असल्याचे समोर आले आहे. कुणाल पांडे (Kunal Pandey), आनंद चौहान आणि सक्षम […]