शेतकऱ्यांच जे काही नुकसान झालं, त्याचा आढावा आम्ही घेतला. 60 लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
अजूनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचलेले आहे. दरम्यान अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा दिला आहे.
यामध्ये पुरात अडकलेले खुलताबादेत ९, वैजापूर २५०, कन्नड तालुक्यातील ११ जणांसह १५ गावांतील एकूण ३५४ नागरिकांना वाचवण्यात यश आलं.
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रभर पाऊस चालू असला तरी प्रामुख्याने मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे.
राहुल गांधी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून पूरग्रस्त पीडितांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंनी आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पावसाचा जोर आजही कायम आहे. दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.
आता शेतकरी किंवा गावातील सजग नागरिक या नात्याने आपली जबाबदारी मोठी आहे. पिक कापणी प्रयोग व्यवस्थित करून घ्याव.
भारतीय हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट.