Piyush Goyal महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटे की टक्कर असताना उत्तर-मुंबईचा गड भाजपच्या पियुष गोयल यांनी सर केला
सांगली लोकसभेत विजय खेचून आणत आम्हीच सांगलीचे किंग असल्याचं अपक्ष उमेदवार विशाल पाटलांनी सिद्ध करुन दाखवलं आहे.
Anil Desai उद्धव ठाकरेंनी पहिला विजय खेचून आणला आहे. ठाकरे गटाचे दक्षिण-मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंचा विजय झाला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अखेर विजय खेचून आणत पराभवाचा वचपा काढला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंनी पराभव केलायं.
LokSabha Election ची मतमोजणी सुरू असून त्यात मुंबईमधील 6 मतदारसंघातील आतापर्यंतच्या मतमोजणीत मिश्र असा कौल दिसत आहे.
कॉंग्रेसचे अजय रॉय यांना 11480 मते मिळाली असून ते 6223 मतांना आघाडीवर आहेत. तर मोदींना 5257 मिळाली असून ते 4089 मतांनी पिछाडीवर आहेत.
पुढील 24 तासांत INDIA आघाडीचाच पंतप्रधान होणार असल्याचा भलताच कॉन्फिडन्स ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक निकालाच्या एक दिवस आधी पोस्ट शेअर केलीयं. यामध्ये त्यांनी ध्यानधारणेचे अनुभव शेअर केले आहेत.
देशातील 64 कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असून हा विश्वविक्रम झाला असल्याचं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे हे सहाव्यांदा मैदानात आहेत. ते आता सहाव्यांदा षटकार मारणार असा अंदाज वर्तवला जातोय.