- Home »
- Pune news
Pune news
लोकसभेच्या रणधुमाळीतचं संजय काकडे संन्यास घेणार?; म्हणाले, सध्याची राजकीय परिस्थिती…
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते संजय काकडेंनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांनी जोर धरला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून राजकारण सोडून द्यावं वाटतं असे सूचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे एकीकडे लोकसभेची रणधुमाळी सुरू असतानाच काकडे राजकारणातून संन्यास घेणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र, या सर्वांमध्ये […]
‘बटण कसं दाबायचं मी सांगणार नाही’, खोचक प्रत्युत्तर देत पवारांची अजितदादांवर ‘कडी’
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘या निवडणुकीत तुतारीसमोरचं बटण दाबा. काल कुणीतरी सांगितलं कसं दाबा म्हणून पण मी काही तसं सांगत नाही. त्यांनी सांगताना हेही सांगितलं की असं दाबलं तर तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आता हे कमी पडू देणार नाही त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. कारण, काही देणंघेणं देऊन मतं मागण्याची […]
“पाकिटमार शोधा, निवडणुकीत त्याला बाजूला करा”; शरद पवारांच्या निशाण्यावर मोदी-शहा
Sharad Pawar Criticized PM Narendra Modi : ‘मोदींनी एकदा सांगितलं होतं की पेट्रोलचा भाव पन्नास दिवसांत खाली आणतो. हे सांगून आज 1 हजार 450 दिवस झाले. पेट्रोल 50 दिवसांत कमी होणार होतं ते कमी तर झालं नाहीच उलट दीडपट वाढलं. पेट्रोल महाग केलं. डिझेल महाग केलं. ऑईल महाग केलं. साखर स्वस्त केली. दूध स्वस्त केलं. […]
मोठी बातमी : पुण्यात डी.एस. कुलकर्णी यांच्या कार्यालयावर ED ची छापेमारी; पाहा व्हिडिओ
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी.एस. कुलकर्णी (D.S.Kulkarni) यांच्या कार्यालयावर ईडीने छापेमारी केल्याचे वृत्त समोर आले आहे. जंगली महाराज रस्त्यावर असणाऱ्या कुलकर्णी यांच्या कार्यालयात ही कारवाई केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ईडीची दोन पथकांकडून ही छापेमारी सुरू असून, हे पथक मुंबईवरून पुण्यात आलं आहे. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके काही वर्षे पुण्यातील येरवडा कारागृहात […]
इंद्राणी बालन फाउंडेशनने जपली सामाजिक बांधिलकी; घट्टे चॅरिटेबल ट्रस्टला रुग्णवाहिका भेट
Pune News : सामाजिक क्षेत्रात काम करणार्या इस्लामपूर येथील डॉ. एन. टी. घट्टे चॅरिटेबल ट्रस्टला पुण्यातील ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’कडून रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या मदतीबद्दल युवा उद्योजक पुनीत बालन यांचे ट्रस्टकडून आभार व्यक्त करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेवर रुग्णालयात नेणे खूप गरजेचे असते. याकामी रुग्णवाहिकेची सर्वाधिक गरज असते. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली तर रुग्णांना […]
‘मनसे ताकदीने मोहोळ यांचा प्रचार करणार’; अमित ठाकरेंची भाजपला ग्वाही
Muralidhar Mohol meet Amit Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्यानंतर आता प्रत्यक्ष प्रचाराच्या हालचालींनाही वेग आला. पुणे लोकसभेसाठी भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मनसे सक्रिय होणार आहे. यासंदर्भात मोहोळ यांनी मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांची आज भेट […]
वसंत मोरेंना PM व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत; अमित ठाकरेंचा खोचक टोला
Amit Thackeray on Vasant More : वसंत मोरेंनी (Vasant More) मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांना वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) पुण्यातून लोकसभेची उमेदवारी दिली. दरम्यान, वसंत मोरेंच्या निर्णयाविषयी अमित ठाकरेंना (Amit Thackeray) विचारले असता त्यांनी वसंत मोरेंवर खोचक टीका केली. पक्षात फुट, आवडता नेता अन् सध्याचं राजकारण; मकरंद अनासपुरेंकडून चिरफाड वसंत मोरेंना पंतप्रधान व्हायचे आहे. […]
मतदानाबाबत जागृती करुन देशाच्या विकासाचे भागीदार व्हा, कंटेट क्रिएटरर्सना पुनीत बालन यांचे आवाहन
Pune News : लोकशाहीमध्ये मतदाराच्या एक मतात सरकार बदलण्याची किंवा स्थापन करण्याची ताकद असते. त्यामुळे अधिकाधिक मतदारांनी या ताकदीचा वापर करावा यासाठी कंटेट क्रिएटर्सनी (Content Creators) मतदानाबाबत जागृती करुन देशाच्या विकासाचे भागीदार व्हावे असे आवाहन ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांनी केले. पुण्यात ‘वन क्लिक वन वोट कॅन चेंज द वर्ल्ड क्रियेटर्स मिट’चे (One […]
बारामतीत भाऊ विरुद्ध बहीण? अजितदादाही भरणार अर्ज; ‘डमी’ उमेदवाराचं गणित काय?
Baramati Lok Sabha Election 2024 : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत (Baramati Lok Sabha Election 2024) ठरली आहे. दोन्हीही उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या दोन्हींपैकी कोणत्या उमेदवाराला निवडून देणार याचं उत्तर निकालानंतरच मिळेल. परंतु, या मतदारसंघात भाऊ विरुद्ध बहीण अशी लढत होणार की काय अशी शक्यताही दिसू लागली आहे. यामागे कारणही […]
पुण्यात शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांची पोलिसांत तक्रार
Pune News : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शिक्षिका विद्यार्थ्याला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे. हा मारहाणीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. मारहाणीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. तसेच या विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांना निवेदन देत या शिक्षिकेविरुद्ध कडक […]