- Home »
- Shivsena
Shivsena
ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ! आता अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस, नेमकं प्रकरण काय?
Anil Desai Summoned: ऐन निवडणूकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या (UBT) अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे (EOW) शाखेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी अनिल देसाई यांना समन्स बजावले आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना (Shiv Sena) घोषित केल्यानंतरही ठाकरे गटाने शिवसेनेच्या खात्यातून पक्षनिधी […]
भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचं आहे का? रामदासभाई एवढे का चिडले?
“सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचं आहे का?” असा संतप्त सवाल विचारत शिवसेनेचे (Shivsena) वाघ म्हटले जाणाऱ्या रामदास कदम यांनी महायुतीतील वाद महाराष्ट्रासमोर आणलाय. हा सवाल जरी एका ओळीचा असला तरी त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या महायुतीमध्ये किती टोकाचे वाद सुरु असावेत याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra […]
18+18+9+3 – सूत्र ठरले, शिलेदारही हेरले… पहा महाविकास आघाडीची संभाव्य समीकरणे
आघाडी-युतीमध्ये निवडणूक लढवताना सर्वात कळीचा मुद्दा ठरणारी गोष्ट म्हणजे जागा वाटप. कोण, किती अन् कोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार या प्रश्नाचे उत्तर शोधताना पक्षाची आणि नेत्यांची पुरती हौस फिटते. त्यानंतर येणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तिथून उमेदवार कोण असणार? तो उमेदवार आर्थिकदृष्ट्या सृदृढ असावा, नेता म्हणून ओळखला जावा, लोकसंपर्क असावा आणि सर्वात महत्वाचे निवडून येण्याची क्षमता […]
पाच कारणे… लोकसभेला अमरावतीमध्ये नवनीत राणांचा गेम होणार!
नवनीत राणा आणि रवी राणा. महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार दाम्पत्य. बायको खासदार आणि नवरा आमदार ते देखील अपक्ष असा दुर्मिळ योगायोग या दाम्पत्याने जुळवून आणला. एका बुलेटवरुन फिरणारे हे दाम्पत्य महाराष्ट्रात कायमच चर्चेचा विषय असतो. ही चर्चा कधी कधी हनुमान चालिसा, कधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका तर कधी स्थानिक लोकप्रतिनिधींशी […]
डिनर डिप्लोमसीवर शरद पवार ‘हिट विकेट’; CM शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आग्रहाचं निमंत्रण नाकारलं
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी दिलेले जेवणाचे आमंत्रण नाकारले आहे. बारामती येथील कार्यक्रमानंतर दोन मोठे कार्यक्रम आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत व्यस्ततेचा असल्याने यावेळी आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे शक्य होणार नाही, असे शिंदे-फडणवीस यांनी पत्र लिहून शरद पवार यांना कळविले […]
मुख्यमंत्र्यांनी फोन करुनही भुसेंनी जाणीवपूर्वक काम घेतलं नाही, ते उद्धटपणे माझ्याशी…; थोरवेंनी सगळंच काढलं
Mahendra Thorve : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आलं. विधानसभेच्या लॉबीत बोलत असताना शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धुक्काबुक्की झाल्याचं वृत्त होतं. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात ही धक्काबुक्की झाली. हा सगळा प्रकार समजल्यानंतर शिंदे गटाकडून सारवासारव करण्यात आली. दरम्यान, या घटनेवर […]
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लागणार? राज्य सरकारकडून प्रभाग रचनेत पुन्हा बदल
मुंबई : मुंबई वगळता राज्यातील सर्व 28 महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला काल (29 फेब्रुवारी) राज्य मंत्रिमंडळाने (state government) मान्यता दिली होती. त्यानंतर आज (1 मार्च) विधिमंडळातही याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मार्गी लागण्याची शक्यता आहे. (state […]
दादा भुसे अन् महेंद्र थोरवे भिडले! शिंदे गटाच्या आमदारांचा विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा
मुंबई : राज्याचे बंदर विकास मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि कर्जतचे शिवसेना (Shivsena) आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत जोरदार राडा झाल्याचे वृत्त आहे. दोघांमध्येही धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, थोरवे यांनी भुसे यांच्याकडे काही कामांची यादी दिली होती. या कामांबाबत थोरवे यांनी विचारणा केली असता दोघांमध्ये वाद झाला आणि […]
राज्यातील 40 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित; लोकसभेपूर्वी शिंदे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : सहकार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतल्याने राज्य सरकारने जवळपास 40 हजार सहकारी संस्थांच्या (cooperative societies) निवडणुकांना (Elections) 31 मे पर्यंत स्थगिती दिली आहे. काल (29 फेब्रुवारी) विधानभवनात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर या निर्णयाचा शासन आदेशही निर्गमित करण्यात आला आहे. केवळ ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा अर्ज […]
‘महायुतीला स्पर्धकच नाही, 48 जागा जिंकणार’; तानाजी सावंतांचा मोठा दावा
Tanaji Sawant : राज्यात मागील काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. अद्याप निवडणूक जाहीर झाली नाही त्याआधीच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. एकीकडे एनडीए (NDA) तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (MVA) राज्यात चाचपणी सुरु आहे. अशातच सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. असाच एक मोठा दावा आता […]