मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, या शब्दांत खासदार नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी तलवार उपसलीयं.
तुम्हाला गाड्याच फोडायच्या असतील तर शरद पवार, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्या फोडा, असं आवाहन वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय. परभणीत आयोजित सभेत ते बोलत होते.
अजित पवार वेशांतर प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलीयं.
मराठा आरक्षण प्रश्नी सर्वच खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून तोडगा काढावा, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
विश्वासघात हे हिंदू धर्मातलं सर्वात मोठं पाप असल्याचं खुद्द शंकराचार्यांनीच सांगितल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर रोख धरला. ते मुंबईत आयोजित मेळाव्यात बोलत होते.
एक नातू अदानींचा ड्रायव्हर बनतो तर दुसरा नातू अंबानींकडे नाचतो, अशी सडकून टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवारांवर केलीयं.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाने तक्रार दाखल केलीयं.
जिरेटोप घालणाऱ्याला अन् देणाऱ्यालाही डोकं नाही, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी प्रफुल्ल पटेलांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
मी चपरासी झालो तरीही चालेल पण मी पुन्हा येईन असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चपरासी असा उल्लेख केलायं.
'डिमॉनिटायझेशन'नंतर आता 4 तारखेला 'डीमोदीनेशन' करणार, या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना धडकी भरवलीयं.