बंडखोर उमेदवारांनी निवडणुकीतून अर्ज माघे घ्या अन्यथा पक्षाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचा कडक इशारा उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आलायं.
पंख छाटण्याचा प्रश्नच नाही, मीच थोरातांना ठाकरे अन् पवारांकडे पाठवलं, असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिलंय.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आलीयं. ह्रदविकाराच्या झटक्यामुळे त्यांना रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे.
गुजराथी ठगाने गुजरात आणि देशामध्ये एक भिंत बांधली असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांवर केलीयं. ते मुंबईत बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी फक्त खुर्चीसाठीच काँग्रेसचं मिंधेपण स्विकारलं असल्याचं चोख प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
आमचं हप्ते जमा करणारं सरकार असून पूर्वीसारखं हप्ते घेणारं सरकार नसल्याची खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलीयं. ते कोल्हापुरात आयोजित मेळाव्यात बोलत होते.
मनसैनिकांच्या हल्ल्यानंतर उबाठा सेनेची फाटली, या शब्दांत टीका करताना भाजपचे आमदार आशिष शेलार यांची जीभ घसरलीयं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत यांच्या स्टाईलने बोलला तर उत्तरंही तशीच येणार असल्याचा खोचक टोला मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावलायं. ते सिंधुदूर्गमध्ये बोलत होते.
अब्दाली खेचरं तुम्हालाच शोधत आहेत, तुम्ही त्यांची मते घेतली आता वक्फ बोर्ड ठरावावेळी तुम्ही पळून गेल्याने तुम्हालाच शोधत असल्याचा पलटवार मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केलायं.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करणारे सुत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्यामागे शरद पवार, उद्धव ठाकरे असल्याचा गौप्यस्फोट माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी केलायं.