आपल्या आईच्या नावाने प्रत्येकानं एक झाड लावावं, ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचं आवाहन

आपल्या आईच्या नावाने प्रत्येकानं एक झाड लावावं, ‘मन की बात’मधून पंतप्रधान मोदींचं आवाहन

PM Modi Man ki Baat : भाजपच्या नेतृत्वाखालील नवीन एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच आज ‘मन की बात’मधून संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. (PM Modi) पर्यावरण आणि वृक्षारोपणाच्या संदर्भानं देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. (Man ki Baat) आई आणि मुलांचं नातं हे जगातील सर्वात मौल्यावान नातं आहे. आपण आपल्या आईसाठी काही देऊ शकत नाही. पण आपण आपल्या आईच्या नावानं एक झाड लावावं असं आवाहन पंतप्राधन नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं.

एकीकडं आनंद तर दुसरीकडं दु:ख; ऐतिहासीक विजयानंतर रोहित-विराटची टी 20 मधून निवृत्ती

आपले आदिवासी बांधव 30 जूनचा हा दिवस ‘हुल दिवस’ म्हणून साजरा करतात. हा दिवस परकीय राज्यकर्त्यांच्या अत्याचारांना कडाडून विरोध करणाऱ्या शूर सिद्धो-कान्हूंच्या अद्भूत धैर्याशी संबंधित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. शूर सिद्धो-कान्हू यांनी हजारो संथाली कॉम्रेड्सना एकत्र करुन इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. 1855 मध्ये हे घडलं होतं. म्हणजे 1857 मध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाच्या दोन वर्षे आधी. तेव्हा झारखंडच्या संथाल परगणा येथील आपल्या आदिवासी बांधवांनी परकीय राज्यकर्त्यांविरुद्ध शस्त्रे उचलली होती असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

चार महिन्यानंतर संवाद मोठी बातमी! खून प्रकरणात शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल

पंतप्रधान मोदींनी तब्बल चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच मन की बातमधून संवाद साधला आहे. लोकसभा निवडणुकींच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला नव्हता. पंतप्रधान मोदींनी तब्बल चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच मन की बात रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील जनतेशी संवाद साधत असतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube