सत्यजीत तांबेंना पाडण्यासाठी नाना पटोले निवडणुकीच्या मैदानात

सत्यजीत तांबेंना पाडण्यासाठी नाना पटोले निवडणुकीच्या मैदानात

नाशिक : नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नाशिक पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्या प्रचारार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) मैदानात उतरले.

सत्यजीत तांबे यांच्यासंबंधी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भूमिका काय याविषयी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाचे विधान केले. बाळासाहेब थोरात हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते माझेही नेते आहेत. त्यामुळे मी त्यांना आदेश देऊ शकत नाही. मात्र, त्यांच्याशी झालेल्या बोलण्यानुसार ते पक्षासोबतच आहेत”, असे पटोले म्हणाले.

या मतदारसंघात भाजपने तांबे यांना आतून पाठिंबा दिल्याचे समोर आले असताना काँग्रेसकडून आता थोरात यांची भूमिका अशा पद्धतीने स्पष्ट करण्यात आली आहे. मात्र, स्वत: थोरात यांनी मात्र अद्याप यावर काहीही भाष्य केलेले नाही.

या जागेच्या दोन प्रबळ दावेदारांमध्ये निवडणुकीची चुरस पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा घेऊन रणसंग्रामात उतरलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी भाजपला आव्हान दिलंय. या निवडणुकीत सामान्य माणसाचाच विजय होणार आहे. आता बलाढ्य खुर्ची देखील हलायला लागली आहे, असं वक्तव्य शुभांगी पाटील यांनी केलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube