‘2 वाजून 36 मिनिटांनी मला फोन…’; डोळे पुसत सतेज पाटलांनी सगळंचं सांगितलं…

  • Written By: Published:
‘2 वाजून 36 मिनिटांनी मला फोन…’; डोळे पुसत सतेज पाटलांनी सगळंचं सांगितलं…

Satej Patil : कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे (Madhurimaraje) यांनी अखेरच्या क्षणी विधानसभा निवडणुकीतून (Vidhansabha Election) माघार घेतल्याने सतेज पाटील यांच्यावर नामुष्की आली. मधुरीमाराजेंच्या या निर्णयामुळं सतेज पाटील यांना निवडणुकीआधीच मोठा बसला. दरम्यान, आज दुपारी घडलेल्या सर्व प्रकारानंतर सतेज पाटील (Satej Patil) यांना बळ देण्यासाठी त्यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर कार्यकर्त्यांनी गराडा घातला. कार्यकर्त्यांशी बोलतांना सतेज पाटलांना अश्रू अनावर झाले.

तोपर्यंत महाराष्ट्राला ‘चांगले’ दिवस येणार नाही, फोडाफोडी राजकारणावरून राज ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

यावेळी बोलतांना सतेज पाटील म्हणाले, काल दुपारपासून माझी कोणाशीही भेट होऊ शकली नव्हती. हे सर्व घडल्यावर भुदरगडमध्ये राहुल देसाईंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होता. गेल्या पाच-सहा महिन्यांपासून मी त्यांना काँग्रेसमध्ये येण्यास सांगत होतो. त्यांनी 5 ते 6 हजार लोकांचा मेळावा बोलावला होता. मी त्या ठिकाणी न जाऊन त्यांचं खच्चीकरण करणं हे काही बरोबर वाटतं नव्हते. त्यामुळं मी दुपारी घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी गेलो, जे काही घडलं ते सर्वांसमोर आहे. मी त्याच्यावर काही टीका टिप्पणी करणार नाही. जे घडलं आहे, त्याला सामोरे जाण्याचं सामर्थ्य तुम्ही मला द्यावं, अशी माझी विनंती आहे. कारणं अनेक संकट माझ्या आयुष्यात आलीत.

2 वाजून 36 मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन
पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले, पद, पैसा, प्रतिष्ठेपेक्षा तुमच्यासारखी माणसं माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. आजही या प्रसंगाला सामोरे जातांना धाडस होतं नाही. मला दुपारी 2 वाजून 36 मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, माघार घेणार आहे. मी म्हटलं असा निर्णय घेऊ नका. काऱण, एक उमेदवारी बदलून दुसरी उमेदवारी कॉंग्रेस पक्षाने माझ्यासारख्या नेत्यावर विश्वास ठेऊन दिली. मी म्हणालो, संकट काहीही असू द्या, असा निर्णय घेऊ नका. तुम्हाला काही झाले तर बंटी पाटील जबाबदार असतील. यानंतर मी फोन ठेवला आणि लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो.

तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग; राणा जगजितसिंह पाटलांनी विकासाचा आराखडा मांडला 

सतेज पाटील म्हणाले, तिथून पुढचा व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे. ती परिस्थिती माझ्या हातात नव्हती. मला अनावर झालं होतं. काय घडतंय मला समजत नव्हतं. त्यांचा हात धरून थांबवणं मला संयुक्तिक वाटत नव्हतं. जे काही घडले ते लोकांसमोर आहे. त्यांनी हा निर्णय का घेतला हे मला माहीत नाही. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. त्यांनी निर्णय घेतला, त्यात बदल होऊ शकत नाही,असं सतेज पाटील म्हणाले.

दरम्यान, मधुरिमाराजे यांनी अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख लढत होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube