शाश्वत विकासकामांमुळे आपला अष्टविजय निश्चित; वळसे पाटलांना पूर्ण विश्वास
मंचर : आंबेगाव – शिरूर तालुक्यातील गावागावांत आपण केलेल्या विकासकामांमुळे आपला अष्टविजय निश्चित असा दृढ विश्वास महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) व्यक्त केला. पोंदेवाडी गावाने नेहमीच मला, पक्षाला मतदानाच्या रूपाने सहकार्य केले आहे. यापुढील काळात आपण विकासकामां अधिक प्राधान्य देऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पोंदेवाडी येथे मतदारांशी संवाद साधताना वळसे पाटील बोलत होते.
विकासकामांमुळे वळसे-पाटलांना मोठं मताधिक्य मिळेल : विष्णू काका हिंगे
विरोधकांकडून भावनेचे राजकारण
उपस्थितांना संबोधित करताना वळसे पाटील म्हणाले की, केलेल्या विकासकामांमुळे जरी आपला अष्टविजय निश्चित आसला तरी, कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये असे आवाहन त्यांनी केले. विरोधकांकडून भावनेचे राजकारण केले जात असून, मतदारांनी आणि नागरिकांनी भूलथापांना बळी पडू नये.
विरोधकांकडे टीका, निंदा अन् नालस्तीशिवाय काहीच नाही; वळसे पाटलांचा घणाघात
पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवला जाणार
तालुक्याच्या पूर्व भागात आपण प्रत्येक गावामध्ये विकासकामे केली. यापुढील काळात या परिसरातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल अशी ग्वाहीदेखील वळसे पाटलांनी दिली. लोणी धामणी परिसरासाठी प्रस्तावित म्हाळसाकांत जल योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अरुणराव गिरे, सचिन पानसरे, नीलेश थोरात, भगवान वाघ, अजित चव्हाण, लक्ष्मण काचोळे आदीसह विविध मान्यवर उपस्थित होते.