मुंबई ठाण्यात वेग मंदावला, गडचिरोलीत सुस्साट.. राज्यात दुपारी तीनपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

मुंबई ठाण्यात वेग मंदावला, गडचिरोलीत सुस्साट.. राज्यात दुपारी तीनपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

Maharashtra Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यात ठीकठिकाणी दुपारनंतर मतदानाने वेग घेतला आहे. सकाळच्या टप्प्यात मतदानाचा वेग संथ होता. दुपारच्या मतदानाने वेग घेतला होता. नागरिकांनी घरातून बाहेर पडत मतदान केंद्रांची वाट धरली. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी 45.53 टक्के मतदान झाले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 47.85 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले होते. तर राज्यात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 45.53 टक्के इतके मतदान झाले आहे.

संथ सुरुवातीनंतर वेग वाढला; अहिल्यानगरमध्ये दुपारी तीनपर्यंत ४७.८५ टक्के मतदान

गडचिरोली जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 62.99 टक्के मतदान झाले होते. तर शहरी भागातील जिल्ह्यांत मतदानाचा वेग मंदावल्याचे दिसून आले. दुपारी तीन वाजेपर्यंत ठाण्यात सर्वात कमी म्हणजे 38.94 टक्के मतदान झाले होते. तर मुंबई शहरात दुपारी तीन वाजेपर्यंत 39.34 टक्के मतदान झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत 47.85  टक्के इतके मतदान झाले होते.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यातील 288 मतदारसंघात मतदान होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मतदानासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली. मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.

सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळेला मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. रोजच्या कामाला सुरुवात करण्याआधी नागरिक मतदान केंद्र गाठत होते. त्यामुळे मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसत होती. सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के इतकेच मतदान झाले होते. त्यानंतर पुढील दोन तासांत म्हणजेच सकाळी 11 वाजेपर्यंत 18.14 टक्के मतदान झाले होते. यानंतर मात्र मतदानाचा टक्का वेगाने वाढू लागला. मतदान केंद्रांवर गर्दीही दिसू लागली. मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

Vidhansabha Election : मुख्यमंत्री शिंदेसह ‘या’ राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा कोणी कोणी केलं मतदान? 

दुपारी एक वाजेपर्यंत राज्यातील 288 मतदारसंघात सरासरी 32.18 टक्के मतदान झाले होते. पुढील दोन तासांत म्हणजे दुपारी तीन वाजेपर्यंत 45.53 टक्के इतके मतदान झाले होते. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 47.85 टक्के, अकोला 44.45 टक्के, अमरावती 45.13 टक्के, छत्रपती संभाजीनगर 47.05 टक्के, बीड 46.15 टक्के, भंडारा 51.32 टक्के, बुलढाणा 47.48 टक्के, चंद्रपूर 49.87 टक्के, धुळे 47.32 टक्के, गडचिरोली 62.99 टक्के, गोंदिया 53.88 टक्के, हिंगोली 49.64 टक्के, जळगाव 40.62 टक्के, जालना 50.14 टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात 54.06 टक्के मतदान झाले होते.

लातूरमध्ये 48.34 टक्के, मुंबई शहर 39.34 टक्के, मुंबई उपनगर 40.89 टक्के, नागपूर 44.45 टक्के, नांदेड 42.87 टक्के, नंदूरबार 51.16 टक्के, नाशिक 46.86 टक्के, धाराशिव 45.81 टक्के, पालघर 46.82 टक्के, परभणी 48.84 टक्के, पुणे 41.70 टक्के, रायगड 48.13 टक्के, रत्नागिरी 50.04 टक्के, सांगली 48.39 टक्के, सातारा 49.82 टक्के, सिंधुदुर्ग 51.05 टक्के, सोलापूर 43.49 टक्के, ठाणे 38.94 टक्के, वर्धा 49.68 टक्के, वाशिम 43.67 टक्के आणि यवतमाळ जिल्ह्यात 48.81 टक्के इतके मतदान दुपारी तीन वाजेपर्यंत झाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube