Vidhansabha Election : मुख्यमंत्री शिंदेसह ‘या’ राजकीय नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा कोणी कोणी केलं मतदान?

  • Written By: Published:
1 / 16

Vidhansabha Election Voting : राज्यात विधानसभेच्या (Vidhansabha Election) 288 जागांसाठी राज्यभरात शांततेत मतदान सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.२०) कुटुबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.

2 / 16

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही कुटुंबासह महाल येथील महापालिकेच्या टाऊन हॉल येथे मतदान केले.

3 / 16

नांदेडमध्ये भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलंय.

4 / 16

नागपूरमध्ये भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पत्नी आणि मातेसह मतदान केले.

5 / 16

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पुण्याच्या बारामतीतील काटेवाडीत मतदानाचा हक्क बजावला.

6 / 16

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नाशिकच्या येवला येथे मतदानाचा हक्क बजावला.

7 / 16

मुंबईतील शिवडी मतदारसंघात भाजपाच्या महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख, आमदार चित्रा वाघ यांनी सहकुटुंब मतदान केले.

8 / 16

आमदार पंकजा मुंडे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलंय.

9 / 16

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांनी खराडी येथील इऑन ग्यानांकुर शाळेत मतदान केले. त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी सौ.संजिला पठारे होत्या.

10 / 16

महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी, त्यांची पत्नी सौ. गौरवी भोसले यांच्यासमवेत रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील पवार मळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजावला.

11 / 16

धनंजय मुंडे यांनी मतदानाचा हक्क बजावला.

12 / 16

आशुतोष काळे यांनी आपल्या कुटुंबासह माहेगाव देशमुख येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून प्रत्येकाने आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहनही त्यांनी केलं.

13 / 16

नगर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनीही सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

14 / 16

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार कलाटे राहुल तानाजी कलाटे यांनीही परिवारासह मतदान केले.

15 / 16

दिलीप वळसे पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजवाला.

16 / 16

मावळ विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube