देशातील 64 कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असून हा विश्वविक्रम झाला असल्याचं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल, वडिल विशाल अग्रवाल यांना 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीयं.
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तळघर सापडल्याचं समोर आलं असून या मंदिराच्या तळघरात पुरातन मुर्ती आढळून आल्या आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या भूमीत राजकारण करणाऱ्यांची माती झाल्याचं डोळ्यांनी पाहिलं असल्याचं म्हणत गोपीचंद पडळकर बरसले आहेत. अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त चौंडीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सातारा जिल्हा प्रशासनाकडून विशाल अग्रवालला दणका देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने महाबळेश्वरमधील बार प्रशासनाकडून सील करण्यात आला आहे.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये स्वत:हुन भटका कुत्रा आल्यास त्याला निवांतपणे झोपू देण्याचा आदेश उद्योजक रतन टाटांनी काढलायं. याबाबत रुबी खान यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे माहिती दिलीयं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बोलणं ऐकून हसू येत असल्याचा खोचक टोला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी लगावलायं. पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधीवर केलेल्या विधानावरुन खर्गेंनी टोलेबाजी केलीयं.
आम्ही निवडणुकीपुरते हिंदु नाही तर रामसेवक असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलीयं. अयोध्येत रामलल्लांच दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मी आत्तापर्यंत मोदींसारखा पंतप्रधान पाहिला नाही, असा घणाघात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलायं. पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्राद्वारे जनतेला आवाहन केलंय.
पुणे अपघात प्रकरणी पोलिसांची वागणूक आणि ससूनमधला हलगर्जीपणा भ्रष्टाचाराचं लक्षण असल्याची टीका काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीयं.