पुणे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालकडे कोणत्या मंत्र्याचे पैसे अडकलेत, त्याची चौकशी करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी केलीयं.
महाडच्या चवदार तळ्यावर आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेला फोटो फाडल्याने त्यांनी जाहीर माफी मागितलीयं.
पुणे अपघात प्रकरणात आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हालनोर, शिपाई अतुल घटकांबळेचं निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आलीयं.
विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षाला पैसा पुरवला? कोणाची भागीदारी? याचा खुलासा झाल्यानंतरच त्याला वाचवणाऱ्यांची नावे समोर येणार असल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे.
आपला चेहरा अन् चमकोगिरीसाठी लोकं प्रयत्न करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला आमदार संजय शिरसाट यांनी आमदार रविंद्र धंगेकर आणि सुषमा अंधारेंना लगावलायं.
पुणे पोलिस आयुक्तालयाजवळच रिकाम्या दारुच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. त्यामुळे पुण्यात नेमंक चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्य सरकारला निवेदन पोहोचण्याआधीच मीडियाला पत्र पुरवल्याचा ठपका ठेवत डॉ. भगवान पवार यांना राज्य सरकारने नोटीस बजावलीयं.
पुणे अपघात प्रकरणी लाडल्याला वाचवण्यासाठी विशाल अग्रवालने डॉ. तावरेंना 2 तासांत 14 फोन केले असल्याची माहिती 'सीडीआर' मधून समोर आलीयं.
जम्मू-काश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा उद्योजक पुनीत बालन यांनी घोषणा केलीयं. डेक्कनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
बांग्लादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाजवळ बसून आधी दारु पिलो, त्यानंतर रात्रभर मृतदेहाचे तुकडे करत असल्याची कबुली कसाई जिहाद्याने दिलीयं.