पुण्यातील अपघात घटनेत मृत झालेल्या आश्विनी कोस्टाच्या आईने ससूनमध्ये आश्विनीचा मृतदेह पाहुन टाहो फोडलायं. वडिलांच्या वाढदिवसाला जबलपूरला येऊन वडिलांना सरप्राईज देणार होती, असं तिच्या आईने यावेळी सांगितलं.
अहमदनगर शहरातील दोन गुंतवणूकदारांना शेअर मार्केटच्या नावाखाली 76 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप करत आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाने तक्रार दाखल केलीयं.
पुण्यात अल्पवयीन मुलाने तरुण तरुणीला कारने चिरडल्याप्रकरणी वडिल विशाल अग्रवाल अटक होण्याच्या भीतीने फरार झाले आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
पुणे-मुंबई धावणाऱ्या दोन रेल्वेगाड्या 28 मे ते 2 जूनपर्यंत अशा 6 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याची बातमी समोर आलीयं.
6 जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा राज्यात खूप मोठं आंदोलन होणार असल्याचा कडक इशारा मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटलांनी दिलायं.
अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात ईडीने याचिका दाखल केली असून केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्याची मागणी करण्यात आलीयं.
"होय, मी दारु पिऊन गाडी चालवत होतो, पप्पालाही माहिती होतं", अशी कबुलीच पुण्यात तरुण-तरुणीला पोर्शे कारने चिरडल्यानंतर अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिलीयं.
एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात आली असून गुजरातमधील अहमदाबाद विमातळावरुन ISIS च्या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीयं.
पुण्यातीलअपघात प्रकरणात कोणालाच सोडणार नसून घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्त अमितेश कुमारांनी दिलायं.