पशुधन वाचवण्यासाठी मुळा डाव्या कालव्यातून तात्काळ आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी तहसीलमध्ये ठिय्या आंदोलन केलं.
देशात दौऱ्या करण्याआधी तुम्ही तिहार जेलमध्ये जाण्याची तयारी करा, या शब्दांत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केजरीवालांना सुनावलं.
राहुल गांधींनी स्वांतत्र्यवीर सावरकरांच्या चांगल्या कामाबद्दल पाच ओळी बोलून दाखवाव्यात, असं खुलं चॅलेंजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलंय.
जाती-जातीत तेढ निर्माण करणारा मोदी पहिलाच पंतप्रधान असल्याची सडकून टीका शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलीयं.
मला ना घरका ना घाटका करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा खुलासा आमदार नरहरी झिरवळ यांनी नाशिकमध्ये आयोजित सभेतून केलायं.
'मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ठाकरे गटाच्या प्रचारात उतरवले असल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर केलायं.
एक फतवा निघाला की विरोधकांकडे 90 टक्के मतदान होतं, तुम्ही मोदींसाठी सुस्ती सोडा, या शब्दांत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी साद घातलीयं.
आपापसांतल्या अडचणींवरुन सुरु असलेला संशयकल्लोळ थांबवा अन् हेमंत गोडसे यांना निवडून द्या, अशी साद छगन भुजबळ यांनी नाशिककरांना घातलीयं.
मुंबई लोकसभेसाठी भाजपकडून राज ठाकरे यांच्याकडे फिल्डींग लावण्यात येत आहे तर एकनाथ शिंदे यांनी तीन वाघ मैदानात उतरवले आहेत.
सोलापुरात मतदान पार पडलं असून निवडणुकीच्या निकालाआधीच उमेदवारांकडून विजयाचा दावा केला जातोयं, गुलाल कोण उधळणार हे 4 जूनला कळणार आहे.