मुंबईसाठी भाजपची राज ठाकरेंकडे फिल्डिंग तर शिंदेंचे तीन वाघ मैदानात!
Mumbai Loksabha : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) चौथ्या टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता पाचव्या टप्प्यासाठी घौडदौड सुरु आहे. पाचव्या टप्प्यांत सर्वच पक्षांकडून मुंबईसाठी फिल्डींग लावण्यात येत आहे. मुंबईत आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही शिवसेनेच्या तीन वाघांवर मुंबईची विशेष जबाबदारी सोपवलीयं. त्यामुळे आता मुंबईसह कोकणात महायुतीकडून जोरदार फिल्डींग लावण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.
बॉक्स ऑफिसवर दिसली ‘श्रीकांत’ची जादू; राजकुमारच्या चित्रपटाने पाच दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी
भाजपकडून मुंबईसाठी राज ठाकरे यांना मैदानात उतरवणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचं अनुषंगाने आज बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलीयं. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकले नाही मात्र पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मुंबईत रणनीती आखण्यासाठीच बावनकुळेंनी राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे.
तर दुसरीकडे चार टप्प्यांत मतदान पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यात एक महत्वाची बैठक घेतली. या बैठकीसाठी शिवसेनेचे सर्वच नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी मुंबईची जबाबदारी आपल्या तीन मंत्र्यांवर दिलीयं. यामध्ये
मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर यांच्यासह ठाण्यातील विश्वासू नगरसेवकांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता मुंबईसाठी भाजपने राज ठाकरे यांना तर शिंदे यांनीही आपले तीन वाघ मैदानात उतरवल्याचं बोललं जात आहे.
Amruta Khanvilkar: मराठमोळ्या अभिनेत्रीने आई- बाबा सोबत केला लंडन प्रवास, पाहा फोटो
पाचव्या टप्प्यांत राज्यात एकूण १३ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांची नजर मुंबईवर स्थिरावली आहे. मुंबईतील सहा जागांवर मतदान होणार असून यामध्ये ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई मतदारसंघात येत्या 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. मुंबईतील तीन जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. तर तीनपैकी दोन जागांवर काँग्रेस विरुद्ध भाजप तर एका जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. मुंबईत प्रचार हळूहळू जोर पकडत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे कामाला लागण्याचे आदेश
येत्या 20 मे रोजी मुंबईतील सहा लोकसभा मतदासंघात मतदान पार पडणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बैठक घेऊन तीन मंत्र्यांवर मुंबईची विशेष जबाबदारी सोपवली आहे. शंभूराज देसाई, दीपक केसरकर, उदय सामंत यांनी तातडीने मुंबईसाठी कामाला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदेंनी या बैठकीत दिले आहेत.
दरम्यान, मुंबईसह कोकणात लोकसभा मतदारसंघातील मतदार असल्याने हे तिन्ही मंत्री विविध मतदारसंघात ठाण मांडणार असून चौकसभा घेत मतदारांवर लक्ष केंद्रीत करणार आहेत. या माध्यमातून त्यांचं निरीक्षण या मतदारसंघात असणार आहे.