माजी हवाई दल प्रमुख मार्शल प्रदीप वसंत नाईक यांच्या पत्नी मधुबाला यांचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याने नाईक यांनी चौकशीची मागणी केलीयं.
हैद्राबाद लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार माधवी लता यांनी महिलांचे बुरखे हटवल्याने त्यांच्यावर मलकपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं.
राजकीय निर्णयांमध्ये धरसोडवृत्ती घातक, तरीही साहेबांचा हट्ट काही संपत नव्हता, असं सांगत अजित पवार यांनी शरद पवारांबद्दलची अंदर की बात सांगितली. ते शिरुर लोकसभा मतदारसंघात आयोजित सभेत बोलत होते.
भारतीय स्टेट बॅक ऑफ इंडियामध्ये तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांच्या भरतीची घोषणा बॅंकेचे चेअरमन दिनेश खारा यांनी केली आहे.
माजी मंत्री सुरेश जैन यांनी शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट) राजीनामा दिला असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आलीयं.
'करारा जवाब मिलेगा...' या शब्दांत शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार उत्कर्षा रुपवते यांनी कडक इशारा दिलायं.
बारामतीतून शरद पवारांचं राजकारण संपवणार असल्याच्या विधानावरुन अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना खडसावल्यानंतर पाटलांनी मौन धारण केलं.
शरद पवार स्वत:च निर्णय घेतात अन् सामूहिक दाखवतात, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीनकरणाच्या विधानावर खरं सांगितलं आहे.
शरद पवार बारामतीत उभे नाहीत तर पराभव करण्याचा विषयच नाही, चंद्रकांत पाटलांचं बोलणं चुकीच असल्याचं म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या विधानावरुन शरद पवारांनी घुमजाव घेतला. मी असं बोललोच नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.