औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण द्या, अशी मागणी मुघलांचे कथित वंशज याकुब हबीबुद्दीन तुसी यांनी संयुक्त राष्ट्राकडे केलीयं.
पुण्यातील रिक्षाचालकांसाठी आरटीओकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून चालकांना गणवेश आणि ओळखपत्र बंधनकारक करण्यात आलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान प्रकरणी शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उपोषणाचा आक्रमक पवित्रा घेतलायं.
येत्या 13 मे रोजी भारताचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना सेवानिवृत्त होणार असून बी. आर. गवई 14 मे 2025 रोजी पदभार स्विकारणार आहेत.
एकतर खुलासा करा नाहीतर चूक कबूल करुन माफी मागा, या शब्दांत अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी खासदार उदयनराजे भोसलेंना प्रत्युत्तर दिलंय.
बाबासाहेबांचे विचार सर्वदुर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त केलंय.
सिंहगड किल्ल्यावर विदेशी पर्यटकाला मराठीतून शिव्या देण्यास भाग पाडल्या प्रकरणी हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलायं.
कुस्तीपट्टू विनेश फोगटने 4 कोटींच्या ऑफरवरुन ट्रोल करणाऱ्यांना ट्विटरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलंय.
ठाकरे गटाच्या नेत्या संजना घाडी यांनी पती संजय घाडे आणि कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केलायं. घाडी यांचा हा प्रवेश ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे काही चालत नाही, असं मिश्किल वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केलंय.