Ajit Pawar Speak on Kunbi Cetificate : मराठा आरक्षणावरुन मराठा बांधव आणि राज्य सरकारमध्ये जोरदार खडाजंगी सुरु असतानाच आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक मोठं विधान केलं आहे. हिवाळी अधिवेशनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मी कुणबी दाखला घेणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अजितदादांच्या विधानामुळे राज्यातील मराठा बांधवांमध्ये एकच चर्चा सुरु […]
Rafale Fighter Jets : भारताची समुद्री ताकद आता आणखीन वाढणार आहे कारण भारतीय नौदलाच्या (India Navy) ताफ्यात आणखीन 26 राफेल लढाऊ विमानांची (Rafale Fighter Jets) भर पडणार आहे. भारतीय नौदलाच्या आएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकांसाठी फ्रान्सने 26 राफेल सागरी लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी निविदा भरल्या आहेत. यासंदर्भात भारताने फ्रान्सशी चर्चा केली होती. BHR गैरव्यवहार […]
Maharashtra Weather : देशभरासह राज्यात आता चांगलाच गारवा सुटणार असल्याची परिस्थिती आहे. कारण सोमवारपासून राज्यातील (Maharashtra Weather) अनेक भागात थंडी वाढणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील मुंबईसह, पुणे ठाणे, विदर्भात नागरिकांच्या अंगावर गरम कपड्यांची चादर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तर शेकोट्या पेटवून नागरिक ऊब घेताना दिसताहेत. नाताळाच्या सुमारास तापमानात वाढ होणार असल्याची शक्यता […]
Devendra Fadnvis Speak On BHR Bank : राज्यभरात चर्चेत असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी मास्टमाईंडसह दोषी आरोपींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) दिला आहे. तसेच पुढील महिनाभरातच या प्रकरणाची कारवाई होणार असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. यासोबतच तत्कालीन सरकारने मंत्री गिरीश महाजनांवरही मोक्का लावण्याचा प्रयत्न केला […]
Gadchiroli Student Food Poisoned : राज्यात मागील दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशातच आता पुन्हा अशीच घटना घडल्याचं समोर आलं आहे. गडचिरोलीतल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाला आहे. शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील 105 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा (Student Food Poisoned) झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भाच्या […]
Mla Disqualification : आमदार अपात्र प्रकरणी विधी मंडळात सुरु असलेली सुनावणी अखेर संपली आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या देखरेखीखाली ही सुनावणी सुरु होती. अखेर ही सुनावणी आता संपली असून सुनावणीमध्ये शिंदे (Shinde Group) आणि ठाकरे (Thackeray Group) या दोन्ही गटाकडून अंतिम युक्तिवाद पूर्ण करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यासह देशाचं लक्ष या […]
Devendra Fadnvis : मुंबईतील हिरे उद्योग गुजरातमधील सुरतला पळवले जात असल्याची झोड विरोधकांकडून उठवण्यात आली आहे. ही झोड उठवल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnvis) याबाबत विधानसभेत स्पष्टीकरण दिलं आहे. हिरे उद्योग सुरतला पळवून नेत असल्याची माहिती चुकीची असून याउलट केंद्र सरकारने मुंबई येथे अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क उभारण्यासाठी ८२ कोटी रुपयांचा निधी दिल्याचं देवेंद्र […]
3 Criminal Law Bills Passed : भारताला आता नवीन गुन्हेगारी कायदे मिळणार आहेत. लोकसभेत आज केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी गुन्हेगारी कायद्याशी संबंधित तीन विधेयकं (3 Criminal Law Bills Passed) मांडली आहे. यामध्ये भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा, भारतीय साक्ष विधेयक हे तिन्ही विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता स्वातंत्र्यानंतर […]
Sushma Andhare Vs Devyani Farande : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि भाजपच्या आमदार देवयांनी फरांदे (Devyani Farande) यांच्यात चांगली रणधुमाळी सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारेंनी नाव न घेता आरोप केल्यानंतर देवयानी अंधारे यांनी अंधारेंविरोधात थेट अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चांगलीच जुंपत आहे. अशातच […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर आता सरकारने फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, फेब्रुवारीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर बोलताना मनोज जरांगेंनी आपली भूमिका मांडली आहे. आरक्षणाशिवाय निवडणुकाच होणार नसल्याचं मनोज जरांगेंनी ठामपणे […]