बांग्लादेशस्थित हिंदुंना संरक्षण द्या, या मागणीचं पत्र ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र धाडलंय.
भाजपच्या 132 जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे नेत छगन भुजबळ यांनी केलायं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुख्य प्रतोदपदी रोहित पवार तर प्रतोदपदी उत्तमराव जानकर आणि गटनेतेपदी जितेंद्र आव्हाडांची नियुक्ती करण्यात आलीयं.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दुसरी बैठक पार पडणार असून या बैठकीत गृहमंत्रिपदाबाबत होणाऱ्या चर्चेतून प्रश्न सुटणार असल्याचं काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय.
एखाद्या मुलाच्या तोंडाजवळ चॉकलेज द्यायचं अन् खेचून घ्यायचं, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी वक्फ बोर्डाचा निधी मागे घेण्यावरुन टीका केलीयं.
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर स्वत: फुलांचा गुच्छ घेऊन जाईल आणि दर्शन घेईल, या शब्दांत आमदार रोहित पवारांनी अजित पवार यांची फिरकी घेतलीयं.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांनी एकूण 17 बुथवरील ईव्हिएम मशीनच्या पडताळणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केलीयं.
नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद घेणार नाहीत, असा दावा शिंदेंचे विश्वासू नेते आमदार संजय शिरसाट यांनी केलायं.
बांग्लादेशातील हिंदुंवरील हल्ल्याच्या मुद्द्याबाबत मी केंद्र सरकारच्यासोबत असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितलंय.
महाराष्ट्रात राजस्थान, मध्यप्रदेशचा पॅटर्न राबवणार आहेत की नाही, याबाबत माहित नाही पण भाजप नेहमीच नव्या पिढीचा शोध घेत असल्याचं भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.