कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणणं बरोबर असल्याची मत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी एका मुलाखतीदरम्यान बोलताना व्यक्त केलं आहे. दरम्यान, नुकत्याच झालेल्या राज्य विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक असून धर्मवीर नसल्याचं म्हणाले. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणं चुकीचं असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं […]
चंद्रपूर : सी फॉर कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी सी फॉर चंद्रपुरसारखी दुसरी कोणती भूमी असू शकत नसल्याचं वक्तव्य भाजप नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. आज चंद्रपुरात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. या सभेत मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, आरपार रावणला पराभूत करायचं असेल तर आरपार रामापासून गोष्ट सुरु […]
औरंगाबाद : कृषी महोत्सवात कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिकांची लागवड आणि तंत्रज्ञानापासून ते विपणनापर्यंत माहिती देणाऱ्या चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ही चर्चासत्रे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील, असा विश्वास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. औरंगाबादेतील सिल्लोड इथे आज राज्यस्तरीय कृषी महोत्सव उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिकच्या दुर्घटनेमुळे मुख्यमंत्र्यांनी स्टॉलला भेट […]
औरंगाबाद : सर्वच नेते मलाच का टार्गेट करतात, असा सवाल राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना केला आहे. औरंगाबादेतील सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मी आज सत्तेत आहे, मी कोणावर टीका-टीपणी करत नाही. सत्तेत असताना कोणावर टीका टीपणी करणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच मी एक […]
औरंगाबाद : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालंय. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्यासाठी त्यांनी सरकारदरबारी अनेकदा मागणी केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारा अस्सल मराठवाडी इरसालपणा आणि मराठवाडी बोलीच्याही गोडव्याचा ठसा उमटवणाऱ्या […]
ठाणे : नवीन वर्षानिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याची धर्मवीर आनंद दिघे यांची प्रथा आजही कायम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आयोजित रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमात केलंय. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबीराला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. तसेच यावेळी एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करून एक वेगळाच […]
नागपूर : हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी होत आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला आहे. दररोज आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आज विधिमंडळात विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव प्रस्ताव आणण्यात आला आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आजचा दिवस चांगलाच गाजलाय. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभा […]
मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर करण्यात आली असून येत्या 30 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांना शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचं वेध लागलं होतं. अखेर निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे, तर याची मतमोजणी ही २ फेब्रुवारूली मतमोजणी होणार आहे. यामध्ये नाशिक […]
नागपूर : ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे पण केंद्र सरकार मात्र तशी जनगणना करत नाही. काही राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्य सरकारप्रमाणे आपल्या राज्यातही जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केली. प्रसार माध्यमांना माहिती देताना नाना […]
नागपूर : हिवाळी अधिवेशनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भासाठी काही महत्वपूर्ण निर्णयांची घोषणा केलीय. यामध्ये विशेषत: जलयुक्त शिवार योजना, सिंचन निर्मिती प्रकल्पाबाबत घोषणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंच्या घोषणा? सुरजागड येथे १४ हजार कोटी व ५ हजार कोटी गुंतवणुकीचे दोन नवीन प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील नुकसानग्रस्त संत्रा उत्पादकांना 562 कोटी रुपये मंजूर सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना […]