अहमदनगर : विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 147 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी 50.40 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी 79 हजार 923 पुरुष तर 35 हजार 715 महिला असे एकूण 1 लक्ष 15 हजार 638 मतदार होते. त्यापैकी […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी एकूण 49.28 टक्के मतदान झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे यांनी दिलीय. नाशिक पदवीधर निवडणूकीत अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे ही निवडणूक राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून या सर्व मतदान केंद्रावर आज […]
जळगाव : बागेश्वर बाबानंतर आता योगगुरु बाबा रामदेव(Baba Ramdev) यांनी देखील वादग्रस्त विधान केलंय. आम्ही जर हत्यारं उचलली असती, तर आज इथे एक सुद्धा मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता, असं वादग्रस्त विधान योगगुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. जळगावमधील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे हिंदू गोर बंजारा –लबाना -नायकडा समाज कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]
पुणे : बारामतीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून सुटणाऱ्या डेक्कन किंवा प्रगती एक्स्प्रेसपैकी एक रेल्वेगाडी बारामतीहून सोडावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे विभागीय रेल्वे प्रशासनाकडे केली. रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू दुबे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सुळे यांनी ही मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बारामती परिसरात उद्योग व्यवसाय शिक्षणाच्या निमित्ताने दररोज […]
अहमदनगर : संगमनेरमधील मतदान केंद्रावर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) रोखल्याचं दिसून आलंय. शुभांगी पाटील यांच्यावर मतदान केंद्रावर प्रचार करत आरोप ठेऊन त्यांना मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांकडून रोखण्यात आलंय. दरम्यान, शुभांगी पाटील सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या बालेकिल्ल्यातच आपला प्रचार करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर त्यांना मतदान केंद्रावर रोखण्यात आल्याचं […]
मुंबई : विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी आज राज्यात मतदान पार पडलं. सकाळी 8 वाजता सुरु झालेली मतदानाची प्रक्रिया सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु होती. यामध्ये अमरावती, कोकण, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, जिल्ह्यांत मतदान पार पडलं आहे. अद्याप या निवडणुकीची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. थोड्याच वेळात आकडेवारीची माहिती समोर येणार आहे. यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत […]
अहमदनगर : जिल्ह्याने नेहमी थोरात (Thorat) आणि विखे (Vikhe) घराण्यामध्ये वाद पाहिला असून तांबे आणि विखेंचा वाद आम्ही होऊ दिला नसल्याचं खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी स्पष्ट केलंय. ते आज अहमदनगरमध्ये आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी आगामी काळात सत्यजित तांबेंबद्दलची(Satyajeet Tambe) आपली भूमिका काय असणार हेदेखील स्पष्ट केलं आहे. पुढे […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खासदारांची बैठक बोलावणे म्हणजे वरातीमागून घोडे, असंच म्हणावं लागणार असल्याचा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी लगावला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाला एक दिवस बाकी असताना विविध तरतुदींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत महाराष्ट्राच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवरुन तपासेंनी ताशेरे […]
अहमदनगर : सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांचं काँग्रेसचे रक्त कमी व्हायला अजून थोडा वेळ लागणार असल्याचा मिश्किल टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांनी लगावला आहे. संगमनेरमधील लोणी गावात आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक पदवीधरसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचाच विजय […]
भुवनेश्वर : गोळीबारामध्ये गंभीर जखमी झालेले ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचं उपचार घेत असताना निधन झालंय. आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावर आज दुपारच्या दरम्यान, झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ गोळीबार करण्यात आला होता. गांधी चौकाजवळ दास यांच्याच सुरक्षेत असलेल्या असिस्टंट सब इन्स्पेक्टरने गोळीबार केला होता. त्यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचार सुरु […]